Jyoti Mete, Vinayak Mete Latest News
Jyoti Mete, Vinayak Mete Latest News Sarkarnama
पुणे

शिवसंग्राम संघटना दिशाहीन होणार नाही : ज्योती मेटे

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आता शिवसंग्रामचं नेतृत्व (Shivsangram) मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी करावं, अशी मागणी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

तसेच दिवंगत नेते विनायक मेटेंसाठी भाजपकडे (BJP) जी मागणी होती तिच मागणी ज्योतीताई मेटे याच्यासाठीही असून त्यांना आमदारकी आणि मंत्रीपद देण्यात याव, अशीही मागणी शिवसंग्रामचे नेके तानाजी शिंदे यांनी केली आहे. पुण्यात आज (ता.६सप्टेंबर) शिवसंग्रामची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या मागण्या केल्या आहेत. (Jyoti Mete, Vinayak Mete Latest News)

विनायक मेंटेंसाठी भाजपकडे ज्या मागण्या होत्या त्याच मागण्या ज्योती मेटे यांच्यासाठीही आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाने आमदार करावं आणि मंत्रीपदही द्याव, अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शिवसंग्रामच नेतृत्वही ज्योतिताईंनी करावं, अशी गळ देखील पदाधिकाऱ्यांकडून त्यांना घालण्यात आली आहे.

शिवसंग्रामच्या माध्यमातून मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच आपल्या मागण्यासाठी भाजप नेतृत्वाकडे शिवसंग्रामचे शिष्टमंडळ जाऊन भेटणार आणि ज्योती मेटेंना आमदार व मंत्रीपद देण्यात यावे ही मागणी करणार असल्याचे तानाजी शिंदेंनी सांगितले आहे.

यावेळी ज्योती मेटेंनीही आपल मत व्यक्त केलं असून त्या म्हणाल्या की, शिवसंग्रामच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये संघटनेची धुरा माझ्यावर द्यावी किंवा आमदार आणि मंत्रीपद याबाबतही विचार करून निर्णय घेऊ,असे त्यांनी सांगितलं. तसेच, कार्यकारणीमध्ये मी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी जो ठराव करण्यात आला, त्याचा सर्वकर्ष विचार करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत विचार करण्यासाठी मी थोडा वेळ घेतला आहे. मात्र संघटनेला नेतृत्व आहे, संघटना दिशाहीन झालेली नाही, असेही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी ज्योती मेटे यांना भाजपने राज्यपाल नियुक्त आमदारकी द्यावी आणि ज्योतीताई यांनी शिवसंग्रामची धुरा सांभाळावी, अशी वारंवार इच्छा व्यक्त केली आहे. तिच मागणी आज पुन्हा करण्यात आली आहे. दिवंगत नेते विनायक मेटे यांचा सर्व पक्षातील नेत्यांशी संपर्क होता. शिवसंग्रामच्या माध्यमातून त्यांनी भाजप, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांसोबत जात तब्बल पाचवेळा विधान परिषदेवर संधी मिळवली होती.

भाजपने मेटे यांच्यावर फडणवीस सरकार असतांना महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मराठा आरक्षणासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील होऊ घातलेल्या भव्य स्मारक समितीत देखील मेटे होते. तसेच राज्यातील सत्तातंरानंतर मेटे यांना सरकारमध्ये विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार होती, असा दावा शिवसंग्रामकडून केला जातोय. आता ज्योती मेटेंना भाजप पुन्हा संधी देणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT