Vasant More attacked cm Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Vasant More: मुख्यमंत्र्यांचा ताफा पाहून वसंत मोरे अचंबित, म्हणाले,आयोग झोपा काढतोय का ?

Vasant More attacked cm Eknath Shinde Election Commission Vidhan Sabha Code of Conduct: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कात्रज येथून जाणारा ताफा पाहून वसंत मोरे यांनी निवडणूक आयोगाला काही सवाल केले आहेत. त्यांनी त्याबाबत सोशल मीडिया वर पोस्ट केली आहे. वसंत मोरे म्हणतात, निवडणूक आयोग काय झोपा काढतोय का ? तेच समजत नाही...

Sudesh Mitkar

Pune News: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर आता राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्वच संविधानिक पदावर असणाऱ्या लोकांना आयोगाने घालून दिलेली बंधन पाळावी लागतात.

आचारसंहिते दरम्यान शासकीय वाहने देखील जमा करावी लागतात. अशातच आचारसंहिता सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी निवडणूक आयोग झोपा काढतोय का? असा सवाल केला आहे.

आचारसंहिता लागू झाल्याने अनेक बंधन संविधानिक पदावर असलेल्या लोकांवर घालण्यात आली आहे.त्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रिया कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये मिरवणूक, सभा घेणे, मोर्चा काढणे, उपोषण करणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यावर निर्बंध जारी केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करताना वाहनांचा ताफा, दालनातील उपस्थितांची संख्या नियंत्रित; मिरवणूक, सभा, घोषणांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.

या आदेशानुसार उमेदवारांना जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात येताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील, या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका दंडाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने वरील कृत्य करण्यास बंदी घातली आहे.

यासह अनेक निर्बंध हे दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास संबंधित लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतात. या बंधनांच पालन मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय नेते मंडळींना करावा लागतं. परवा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कात्रज येथून जाणारा ताफा पाहून वसंत मोरे यांनी निवडणूक आयोगाला काही सवाल केले आहेत. त्यांनी त्याबाबत सोशल मीडिया वर पोस्ट केली आहे. वसंत मोरे म्हणतात, निवडणूक आयोग काय झोपा काढतोय का ? तेच समजत नाही...

15 ऑक्टोंबरला राज्यात आचारसंहिता लागू झाली त्यानंतर कोणीही या राज्याच्या संविधानिक पदावर नसताना सुद्धा पदाचा कसा गैरवापर चालू आहे त्याचेच हे उदाहरण...

परवा रात्री 1:00 वा. रात्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कात्रज चौकातून गेले असता त्यांच्यासाठी असणारा हा प्रोटोकॉल योग्य आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थिती केला आहे. ते काळजीवाहू मुख्यमंत्री असले तरी त्यांच्यासाठी पंधरा मिनिटं वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे त्यांनी नागरिकांची काळजी घेणे ही तितकच गरजेचं होतं असं वसंत मोरे म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT