ShivSena workers
ShivSena workers sarkarnama
पुणे

बिनविरोध निवडून आलेला कुणाचा? शिवसेना-राष्ट्रवादीला समान जागा मिळताच जुंपली

सुदाम बिडकर

पारगाव : मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील श्री. गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Society Election) शिवसेनेने ११ जागा पैकी ६ जागा जिंकून मुसंडी मारील आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच शिवसेना (ShivSena) तालुका प्रमुख अरुण गिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाच जागा जिंकल्या आहे. बिनविरोध निवडून आलेले नवनाथ दगडू कोरके हे आमचेच असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या बॅनरवर हि कोरके यांचे छायाचीत्र आहे. दोन्ही पक्षाकडे प्रत्येकी सहा-सहा समान संचालक झाले आहेत. त्यामुळे अध्यक्ष कोणाचा होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. येथील सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत एकूण १३ जागांपैकी भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गासाठी एकही अर्ज न आल्याने ती जागा रिक्त राहिली. तर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी नवनाथ कोरके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित ११ जागांसाठी गिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुरस्कृत श्री. गणेश कृपा सहकार ग्रामविकास पॅनेल होते. माजी सरपंच जिजाभाऊ मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत श्री. गणेश शेतकरी विकास पॅनेल होते. या दोन्ही पॅनलमध्ये सरळ-सरळ लढत झाली.

अरुण गिरे यांच्या पत्नी सुषमा गिरे या महिला राखीव गटात उभ्या असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. रविवारी मतदान झाले त्या नंतर सायंकाळी लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. शिवसेनेचे दशरथ बाबुराव मेंगडे, तुळशीराम महादू गवारी, तुकाराम बापू भोर, दिनकर हौशिराम मेंगडे, बन्सीराम प्रभाकर मेंगडे, सुषमा अरुण गिरे हे सहा जण निवडून आले आहेत.

राष्ट्रवादीचे बाळासाहेब सावळेराम मेंगडे, धनेश यशवंत टाव्हरे, जिजाभाऊ रामभाऊ गवारी, आनंदराव गंगाराम मेंगडे, शकुंतला कैलास मेंगडे, नवनाथ दगडू कोरके (बिनविरोध) हे सहा जण निवडून आले. त्यामुळे दोन्ही पक्षाकडे प्रत्येकी सहा सहा समान संचालक झाले आहे. त्यामुळे अध्यक्ष कोणाचा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मागील पंचवार्षिकला या सोसायटीत शिवसेनेचा एकही संचालक नव्हता. मात्र, या निवडणुकीत अरुण गिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने नियोजनबध्द प्रचार करत केला. त्यामुळे ११ जागांपैकी सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटातून आठ पैकी पाच व महिला राखीव मधून एक अशा सहा जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT