Milind Narvekar
Milind Narvekar sarkarnama
पुणे

Cricketnama : शिवसेनेने भाजपला चारली धूळ; मिलिंद नार्वेकरांना उचलून घेत जल्लोष

सरकारनामा ब्यूरो

पुणे : एरव्ही राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी फलंदाची करणारे राजकीय नेत्यांची क्रिकेटच्या मैदानातली कामगिरी जोरदारपणे रंगली. मैदानावरही जोरदार फटकेबाजी झाली. राज्याच्या राजकारणात गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेला भाजप-शिवसेनेचा सामना यावेळी क्रिकेटच्या मैदानावरही रंगला.

भाजपची (BJP) टीमचे कॅप्टन अहमदनगरचे खासदार सुजय विखे होते. तर शिवसेनेचे (Shivsena) सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नेतृत्वात शिवसेना मैदानात उतरली होती. त्यामध्ये शिवसेनेने उत्तम खेळी करत ९ विकेट्सने पहिला सामना जिंकला. शिवसेना भाजपवर भारी पडली. शिवसेनेच्या खेळाडूंनी नार्वेकरांना उचलून घेत जल्लोष केला. खासदार धैर्यशिल माने शिवसेनेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

धैर्यशिल मानेंनी तुफान फटकेबाजी करत ५ बॉलमध्ये १३ धावा फटकावल्या. त्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुतें यांनी धैर्यशिल माने यांची विकेट घेतली. मात्र, महापालिकेपासून राजकारणाची सुरुवात करुन दिल्ली गाठण्याचा इरादा करणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी पुण्याच्या मैदानावर रोखले. शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर मिलिंद नार्वेकर यांनी मोहोळ यांची विकेट घेतली.

या क्रिकेटनामा स्पर्धेचे उद्घाटन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या उकाळ्या-पाकळ्या काढून गढूळ झालेले महाराष्ट्रातील राजकारण शांत करण्यासाठी सरकारनामाची ही स्पर्धा मदत करेल असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT