NCP Latest News
NCP Latest News Sarkarnama
पुणे

शिवसेनेची 'महाप्रबोधन', कॅाग्रेसची 'भारत जोडो'आता राष्ट्रवादीची 'शेतकरी दिंडी'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनावर विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी निघणार आहे.आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. (NCP Latest News)

२०१४ मध्ये राज्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हिवाळी अधिवेशनावर ‘हल्लाबोल’ यात्रा काढली होती. या यात्रेला विदर्भात प्रतिसादही मिळाला होता. याच धर्तीवर १८ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर विदर्भातूनच 'शेतकरी दिंडी' काढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतची सर्व तयारी आणि नियोजन ३० नोव्हेंबर अगोदर जाहीर होणार असल्याचे समजते.

दरम्यान, राज्यात शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा सुरू असून तीला मोठा प्रतिसाद मिळत असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेलाही राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच धर्तीवर विदर्भातील सामान्य शेतकरी,शेतमजूर,छोटे व्यापारी,बेरोजगारी संदर्भात ज्वलंत प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील 'शेतकरी दिंडी' काढली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT