Amol Mitkari & Jitendra Awhad Sarkarnama
पुणे

Shivaji Maharaj Controversy: शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले? असा दावा करणाऱ्या अभिनेत्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपटले कान; Video पाहा

Jitendra Awhad Amol Mitkari Attack ON Rahul Solapurkar: औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले...असे संतापजनक विधान राहुल सोलापूरकर यांनी केले आहे.

Mangesh Mahale

Pune 4 Feb 2025: एका मराठी ज्येष्ठ अभिनेत्यानं महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानं राजकारण तापलं आहे. अभिनेता राहुल सोलापूर यांनी 'शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली,'याबाबत संतापजनक दावा केला आहे. महाराजांबाबत सोलापुरकरांनी केलेल्या दाव्याचे राजकीय पडसाद उमटायला आता सुरवात झाली आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाला होत आहे. समाज माध्यमांवर त्यांच्यावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे राहुल सोलापुरकरांवर तुटुन पडले आहेत. सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी त्यांना खडेबोल सुनावले.

शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले...असे संतापजनक विधान राहुल सोलापूरकर यांनी केले आहे. त्यांचा या विधानाचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

“हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय”, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकरांचे कान उपटले आहेत.

"राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु "हैवान" असल्याच सिद्ध केलंय. शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान,आपल्या विकृत मानसिकतेतुन इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणुन कधीच खपवून घेतल्या जाणार नाही," असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT