Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil Sarkaranama
पुणे

Amol Kolhe Vs Adhalrao Patil : आढळराव शरद पवारांच्या संपर्कात? पण त्या दरवाजाच्या चाव्या माझ्याकडेच; कोल्हेंचा खळबळजनक दावा

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहे. मात्र त्यावर भाजपकडूनही वारंवार दावा सांगितला जात आहे. या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील शरद पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक खुलासा खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. (Latest Political News)

माजी खासदार आढळराव पाटील यांनी खासदार कोल्हे यांच्यावर काम करत नसल्याची टीका केली. कोल्हे यांनी शिरूरमधील जनतेशी प्रतारणा केल्याचा आरोप केला. यावर कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा समाचार घेतला.

अमोल कोल्हे म्हणाले, "चार वर्षात सुरू असलेल्या कामांचे तुम्ही श्रेय घेण्यासाठी धडपडत आहात. मात्र ही कामे तुमच्या १५ वर्षांच्या काळातच होणे अपेक्षीत होते. या काळात तुमच्यासाठी काम करणारे एकही व्यक्ती आमदार म्हणून निवडून आलेली नाही. याची दखल शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये मोदींची प्रचंड लाटेतही शिरुरमधील जनतेने तुम्हाला नाकारले."

यावेळी कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यासाठी काम केल्याची खंतही व्यक्त केली. अमोल कोल्हे म्हणाले, "महाराष्ट्रला एक सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. सध्या मात्र राज्यात राजकारणाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. या राजकीय स्थितीबाबत आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्याने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करणे अपेक्षीत होते. परंतु या घटनांमध्येही आपण संधी शोधत आहात. तुमच्या या भूमिकेमुळे २०१४ साली तुमच्यासाठी प्रचार केल्याचे मला खूप वाईट वाटले."

आढळराव पाटील यांना संधीसाधू म्हणत ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही कोल्हे यांनी केला. अमोल कोल्हे म्हणाले, राज्याच्या राजकीय स्थितीबाबत तुम्ही माध्यमांसमोर एक बोलता अन् पाठीमागच्या दाराने शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दारे ठोठावता. मात्र तुम्ही जी दारे ठोठावत आहात त्याच्या चाव्या माझ्याकडेच आहेत. मात्र आपल्या वयाचा मान ठेऊन मी आपले स्वागत करीनच. पण राजकारणातील सुसंस्कृतपणा जपला जावा एवढीच माझी अपेक्षा आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT