Amol Kolhe News  Sarkarnama
पुणे

Adhalrao Vs Kolhe : आढळराव-कोल्हे यांच्यात जुंपली; राउंडवर येणारा नेता पाहिजे का ग्राउंडवर काम करणारा...

Uttam Kute

Shivajirao Adhalrao Patil News : शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा खासदारकीचा चौकार डॉ. अमोल कोल्हेंनी Amol Kolhe 2019 ला हुकविल्याने हे दोघे नंतर कट्टर शत्रू झाले. त्यातून ते एकमेकांवर जहाल टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सोमवारी 11 तारखेला शिरूरला आढळरावांनी राउंडवर येणारा नेता कोल्हे पाहिजे का, ग्राउंडवर काम करणारा आढळराव, अशी साद मतदारांना घालत कोल्हेंवर पुन्हा हल्लाबोल केला.

कोल्हेंचे नाव घेत आढळरावांनी Shivajirao Adhalrao Patil त्यांच्यावर या वेळी सडकून टीका केली. ती करताना मतदारांना आवाहन केले. त्यातून त्यांचा शिरूर लढण्याचा मनसुबा अद्याप कायम असल्याचा दिसला. संसदेत नंदीबैल पाठवायचा की, वाघ या कोल्हेंच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. वाघ पाठवायची भाषा कोल्हेंनी करू नये, असा टोला त्यांनी लगावला. तसेच संसदेत पोपट (कोल्हे) नाही, तर विकासकामे करणारा माणूस पाठवायचा आहे, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरूर Shirur Loksabha Costituency येथील 70 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर आढळराव बोलत होते. या वेळी कोल्हेंवर टीका करताना त्यांचा सूर आणखी टिपेला गेल्याचे दिसला. चुकीचा उमेदवार दिल्याबद्दल शिरूरची जनता आता आक्रोश करीत आहे, असा दावा त्यांनी केला. कारण कोल्हेंनी एका रुपयाचे काम केले नाही वा एक गावभेट केली नाही. फक्त चांगली भाषणे केली म्हणजे मतदारसंघातील प्रश्न सुटत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विकासकामे करणे हे नटाचे काम नाही, हे अजितदादा Ajit Pawar बोलले ते आहे, असे ते म्हणाले.

वर्षातून एकदा केव्हातरी, ते गावाला म्हणजे नारायणगावला स्वताच्या घरी येतात. त्यामुळे असा राउंडवर येणारा की, माझ्यासारखा ग्राउंडवरील नेता तुम्हाला पाहिजे, असे म्हणत आढळरावांनी शिरूरवासीयांना साद घातली. गल्लीत फिरणारा म्हणून ते माझी खिल्ली उ़डवितात, ते खरं आहे. कारण राजकारण गल्लीतूनच सुरू होते, असे आढळराव म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या फटकेबाजीवर कोल्हेंकडून काय उत्तर येते, याकडे आता शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT