Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Adhalrao Will Join NCP : आढळराव 20 वर्षांनंतर स्वगृही राष्ट्रवादीत परतणार; शिरूरमध्ये पुन्हा कोल्हेंशी कुस्ती

Shirur Lok Sabha Constituency : आढळराव पाटील हे तेव्हा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हाेते. त्यांना 2004 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खेड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र, तत्कालीन खासदार अशोकराव मोहोळ यांनाच पक्षाने तिकीट दिले होते. त्यामुळे आढळराव पाटील यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

Vijaykumar Dudhale

Pune, 23 March : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला असून, येत्या 26 मार्च रोजी ते राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. खुद्द आढळराव पाटील यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर शिवाजीराव आढळराव पाटील हे स्वगृही पतरणार आहेत. शिरूरमधून ते राष्ट्रवादी उमेदवार असतील, त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी होणार आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते होते. आंबेगाव तालुक्यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांची अतूट मैत्री होती. तेव्हा आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हाेते. त्यांना 2004 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खेड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र, तत्कालीन खासदार अशोकराव मोहोळ यांनाच पक्षाने तिकीट दिले होते. त्यामुळे आढळराव पाटील यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर तब्बल 20वर्षांनंतर आढळराव पाटील राष्ट्रवादीत परत येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत आढळराव म्हणाले, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा राष्ट्रवादीत (NCP) येत्या 26 तारखेला सायंकाळी प्रवेश होणार आहे. प्रवेशासंदर्भात माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. या दोघांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे, त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाला महायुतीच्या नेत्यांकडून हिरवा कंदील मिळालेला आहे.

आढळराव म्हणाले, माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे, त्यामुळे उमेदवारी निश्चित होणार का, असा प्रश्न विचारण्याची गरजच नाही. कारण घड्याळ्याच्या चिन्हावर मीच शिरूरमधून निवडणूक लढविणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी मी उभा राहणार आहे. शिरूरमधून माझा विजय होईल, याची मला शंभर टक्के खात्री आहे.

माझं जे कॅलक्युलेशन आहे, त्यानुसार पहिली निवडणूक मी तीस हजार मतांनी जिंकलो होतो. दुसरी निवडणूक मी एक लाख 80 हजार मतांनी जिंकलो, तिसरी तीन लाखांनी जिंकलो होतो. आगामी निवडणूक हे सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल, असा मला विश्वास आहे. पंतप्रधान मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आणि सर्व उमेदवार जिंकतील, असा विश्वासही आढळराव पाटील यांनी बोलून दाखवला.

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार पळवला, असं काही नाही. मी महायुतीमधलाच उमेदवार आहे, असेही आढळराव यांनी नमूद केले. दरम्यान, शिरूरमधून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी घोषित झाली आहे, त्यामुळे शिरूरमध्ये पुन्हा आढळराव विरोधात कोल्हे असाच सामना रंगणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT