shivajirao adhalrao patil-chandrkant khaire
shivajirao adhalrao patil-chandrkant khaire  
पुणे

आढळराव, खैरे आता गाव तिथे शिवसेना पोहोचविणार....

गणेश कोरे

पुणे : शिवसेनेचा परंपरागत राजकीय आणि वैचारिक मतभेद असलेल्या कॉंग्रेस राष्‍ट्रवादीसोबत हातमिळवणी करत राज्यात पक्षाने सत्ता स्थापन केली खरी. मात्र हि हातमिळवणी तळागाळातील शिवसैनिकांसह मतदारांना देखील खटकल्याने भविष्यात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेने आपली पारंपारिक मोहिम ‘गाव तिथे शाखा.. आणि घर तिथे शिवसैनिक.. हि मोहिम अधिक जोमाने राबविण्यात येणार आहे. यासाठी नव्या, जुन्या शिवसैनिकांची सांगड घालत ज्येष्ठांवर पक्षविस्ताराची जबाबदारी देण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर ८० च्या दशकात शिवसेनेने ग्रामिण महाराष्ट्रात विस्तारासाठी `गाव तिथे शाखा` आणि `घर तिथे शिवसैनिक` मोहीम युद्ध पातळीवर राबवली होती. या मोहिमेद्वारे गावागावात, नाक्यानाक्यावर शाखांचा विस्तार करण्यात शिवसेना यशस्वी झाली होती. या मोहिमे बरोबरच प्रत्येक शाखेवर रुग्णवाहिकांची मोहीम देखील राबविण्यात आली होती. मात्र ती मोहिम शहरी भागात रुजली होती.

विधानसभा निवडणुक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन भाजपाशी फारकत घेत शिवसेनेने आपले पारंपारिक वैचारिक विरोधकांशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. हि महाविकास आघाडी किती दिवस टिकेल याबाबत राजकीय क्षेत्रात शंका उपस्थित होत असताना, भविष्यात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा आपली जुनी मोहिम `गाव तिथे शाखाॊ आणि `घर तिथे शिवसैनिक` राबविण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी नव्या, जुन्या शिवसैनिकांची सांगड घालत ज्येष्ठांवर पक्षविस्ताराची जबाबदारी देण्यात येणार आहे.

जबाबदारी देण्यात येणार असलेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, तानाजी सावंत या माजी मंत्र्यांसह विधानसभा निवडणुकीत धक्‍कादायक पराभव झालेले माजी मंत्री विजय शिवतारे, अर्जुन खोतकर यांच्यासह लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवाजीराव आढळराव, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ या खासदारांसह अनेक ज्येष्ठ; तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना पक्षविस्तारासाठी आव्हानात्मक जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचे शिवसेना नेत्यांच्या गोटातून सांगण्यात आले.

शिवसेना खेड्यापाड्यात पोहचली असून पुन्हा याच मोहिमेतुन आम्ही राज्यभरातील गावागावात घराघरात पोहचून शिवसेना राज्यातील सर्वांत शक्तीशाली पक्ष बनवु. पुणे जिल्ह्यात हिच मोहिम आम्ही उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवत जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष बनवू, असे पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT