Pune News : पुणे शहराची ओळख शिक्षण आणि सांस्कृतिक शहर अशी आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात एका हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर सर्वच हादरले आहे. एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेवर अंडे चोरल्याचा आरोप करण्यात आला. त्या आरोपानंतर त्या महिलेला अंगावरील कपडे उतरवण्यास लावले. हा प्रकार पुणे शहरात हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने केला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुकेश सिंह पुंडील असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या कर्मचाऱ्यावर हॉटेल प्रशासनाने काय कारवाई केली का? यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकली नाही. पुणे येथील हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये आरोपी मुकेश सिंह पुंडील हा शेफ म्हणून काम करत आहे. पीडित ५० वर्षीय महिला या हॉटेलमध्ये कामाला आहे.
मुकेश सिंह याने त्या कामगार महिलेवर तू अंडे चोरले असल्याचा आरोप केला. हे अंडे तू लपवून ठेवले आहेत का असे म्हणत तुझी अंग झडती घ्यावी लागेल, असे म्हटले. त्यानंतर त्याने त्या महिलेला कपडे उतरण्यास भाग पाडले. आरोपी मुकेश सिंह येथेच थांबला नाही तर त्याने त्या महिलेचा रस्ता अडवून तिच्यावर शेरेबाजी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकरणी महिलेनी येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने केलेल्या या प्रकारानंतर संताप व्यक्त होत आहे. पुण्यासारख्या सुस्कृंत शहरात झालेल्या या प्रकाराबद्दल सर्वस्तरातून चिड व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस तपास करत आहे.
(Edited by Sachin Waghmare)