Murder Case  sarkarnama
पुणे

Pune Murder Case: धक्कादायक: पुणं हादरलं! कात्रीनं पत्नीचा खून करुन पतीनं केला व्हिडिओ व्हायरल

Pune Husband-Wife Murder Story : पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून सातत्याने भांडण होत होती. याच भांडणातून शिवदास याने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला.

Sudesh Mitkar

Pune crime 23 Jan 2025: पुण्यामध्ये खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने घरगुती वादातून पत्नीचा खून केला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर पती स्वतः पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला आहे.

कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने घरगुती वादातून शिवण मशीन कात्रीच्या साह्याने पत्नीच्या गळ्यावर वार करुन खून केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. खून केल्यानंतर त्याने खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

ज्योती शिवदास गीते असे खून झालेला पत्नीचे नाव आहे. पती स्वतः चंदन नगर येथील पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे ही घटना घडली.

शिवदास गीते असे पतीचे नाव आहे. तो बीड येथील रहिवासी आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करत असून खराडी परिसरात त्याने राहण्यासाठी भाड्याने घर घेतले आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून सातत्याने भांडण होत होती. याच भांडणातून शिवदास याने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला.

आपली प्रॉपर्टी पत्नी हडप करेल, असा शिवदासला संशय होता. पत्नी आपल्या हत्येचा कट रचत असल्याचा देखील त्याला संशय होता. या संशयातून त्याने पत्नीचा खून केला. या बाबतचा पुढील तपास खराडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करीत आहे. ज्योती गीते यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT