पुणे : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासावर निर्माण येऊ घातलेल्या चित्रपटांवर जोरदार टीका केली आहे. हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले या दोन चित्रपटांवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. महाराष्ट्राचं इतिहासाचं विद्रुपीकरण होतंय, असा आक्षेप त्यांनी दिली. हे चालणार नाही यापुढे आणि चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान त्यांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मुलाचा फोटो दाखवत, असा असतो का मावळा, असा सवाल उपस्थित केला.
मांजरेकर यांच्या मुलाचा फोटो दाखवत संभाजीराजे म्हणाले की, दत्ताजी पाघे हे वेडात दौडलेल्या सात मराठ्यांपैकी एक आहेत. हा काय मावळा साऱखा दिसतो का? चामडी पट्टे मावळे घालतात का? असं आपल्याला मराठ्यांचा इतिहास दाखवायचं आहे का? मध्येच काहीतरी सुरू झालंय मराठी आणि मराठे. पूर्वीचे मराठे म्हणजे आपण सर्वजण. सगळे अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार म्हणजे मराठी. हे कुठून आलं मराठे आणि मराठी? मराठी ही जात नव्हती. हे चालणार नाही यापुढे आणि चालू देणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
“जर यापुढेही त्यांनी असेच चित्रपट येत राहिले तर गाठ माझ्याशी आहे. आता काढून तर बघा. मीच यांना आडवणार. काहीही झालं तरी, असा चुकीचा इतिहास लोकांसमोर पुन्हा आणलात तर याद राखा,”, असा गर्भित इशाराच संभाजीराजेंनी दिला.
सिनेमॅटीक लिबर्टी, व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून आपण काहीही करायचं का? भालजी पेंढारकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. यात आमची सुद्धा चूक आहे. आपल्या लोकांची देखील चूक आहे. आपण शिवरायांची पुस्तके वाचत नाहीत. वा.सी.बेंद्रे, मेंधळे, जयसिंगराव पवार सर असतील, या लोकांनी इतिहासलेखन करताना आयुष्य पणाला लावलं. लोकांना नाट्यरुपांतर रूचतं म्हणून, काही करून इतिहासात फेरफार करणार का? असे संभाजीराजे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.