Shrirang Barne, Laxman Jagtap
Shrirang Barne, Laxman Jagtap Sarkarnama
पुणे

Shrirang Barne: ...अखेर 'असं' संपलं आप्पा आणि लक्ष्मणभाऊ यांच्यातलं १० वर्षांचं वैर!

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Shrirang Barne News : मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर २००९ पासून सुरु झाले. त्यावेळी जगतापांनी विधानसभेला बारणेंचा चिंचवड मतदारसंघात पराभव केला. त्याची परतफेड अप्पांनी २०१४ ला भाऊंचा लोकसभेला मावळ मतदारसंघात पराभव करून केली. त्यामुळे हे वैमनस्य आणखी वाढले.

ते २०१९ च्या लोकसभेपर्यंत कायम होते. भाऊ हे अप्पांच्या प्रचारात सामील झाले नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. त्यानंतर अप्पा हे भाऊंच्या घरी गेले. आता संघर्ष होणार नाही असा शब्द दिला अशाप्रकारे १० वर्ष राजकीय वैर जपलेल्या अप्पा आणि भाऊंमध्ये दिलजमाई झाली

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे या महिन्यात (दि.३) कर्करोगाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल (दि.१४) सर्वक्षीय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात लक्ष्मणभाऊंबरोबरचं दहा वर्षाचं कट्टर राजकीय वैर कसे संपवले याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उजाळा दिला. बारणे म्हणाले, आमच्यात राजकीय मतभेद होते, मनभेद नव्हते,असे अप्पा त्यावेळी म्हणाले.तर, पक्ष महत्वाचा असल्याने मोदींना पंतप्रधान करण्य़ासाठी स्वार्थ बाजूला ठेवल्याची प्रतिक्रिया भाऊंनी दिली होती.

भाऊ व आपल्यातील राजकीय संघर्ष मिटण्यास कारणीभूत ठरलेले फडणवीस, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व सध्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे यावेळी उपस्थित आहेत,याचा खा.बारणेंनी काल खास उल्लेख केला.भाऊंचे कार्य कोणी नाकारू शकणार नाही,असे ते म्हणाले.चांगले काम करणारा नेता या शहराने गमावला,अशी खंतही श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barne) नी व्यक्त केली.

एक राजकीय कार्यकर्ता कसा असावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.कोणाला विकासासाठी काम करताना बरोबर घेतले पाहिजे, एखादे कार्य कशा पद्धतीने तडीला न्यावे, याची क्षमता त्यांच्यात होती. दरम्यान,२०१९ ला बारणे आणि आप्पांमध्ये झालेली ही दिलजमाई अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहिली.

अन् फडणवीस गहिवरले...

राज्यसभा निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवार निवडून येण्याचे गणित आम्ही मांडत होतो, मते कमी होती. अशा परिस्थितीत लक्ष्मणभाऊंची तब्येतही खालावलेली असताना पीपीई कीट घालून लाईफ सेव्हिंग रुग्णवाहिकेद्वारे पूर्णपणे झोपून त्यांनी मुंबई गाठली. आम्ही सर्वजण दरवाजातच त्यांना घ्यायला उभे होतो. पीपीई किट, मास्क घातलेले लक्ष्मणभाऊ चाचपडत खाली उतरले. विरोधी पक्षनेते असताना ते सॅल्युट करून म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब तुमच्यासाठी आलो. आजही ती आठवण आली की डोळे भरून येतात. ही आठवण सांगत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे डोळे भरून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT