Dr Suresh Jadhav
Dr Suresh Jadhav Sarkarnama
पुणे

अदर पूनावालांच्या आधीपासून 'सिरम'ची धुरा सांभाळणारे सुरेश जाधव यांचं निधन

सरकारनामा ब्युरो

पुणे : जगात लस उत्पादनात आघाडीवर असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव (Dr Suresh Jadhav) यांचे बुधवारी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. 'सिरम'ची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांतच ते रूजू झाले होते. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांच्या जन्माआधीपासून ते 'सिरम'मध्ये कार्यरत होते. लस निर्मितीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना या क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जात होते.

डॉ. जाधव हे 1979 मध्ये 'सिरम'मध्ये दाखल झाले होते. तर 1992 पासून त्यांच्याकडे संस्थेच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी होती. त्यांचा या पदाचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत होता. पण त्यांनी काही दिवसांपुर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. जवळपास 42 वर्ष यांनी सिरममध्ये अव्याहतपणे काम केले. यामध्ये विविध लशींच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जगभरातही त्यांची या क्षेत्रात मोठं नाव होतं.

कोरोनावरील कोविशिल्ड (Covishield) या लशीचे उत्पादन सिरमकडून केले जात आहे. या प्रक्रियेतही जाधव यांनी खूप मेहनत घेतली. ते मुळचे बुलढाणा येथील आहे. नागपूर विद्यापीठातून त्यांनी औषधनिर्मितीशास्त्रामध्ये 'पीएच. डी.' मिळवली. त्यानंतर 1970 पासून पन्नास वर्षे अखंडपणे या क्षेत्रात राहिले.

जाधव हे सुरूवातीला नागपूर विद्यापीठ व 'एसएनडीटी' विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम करत होते. त्यानंतर ते हापकिनमध्ये संशोधक म्हणून रुजू झाले. तिथून त्यांचे लस निर्मिती क्षेत्रातील काम सुरू झाले. पुढे 1979 मध्ये0 सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाल्यानंतर ते अखेरपर्यंत तिथेच थांबले. त्यांनी अनेक महत्वाच्या समित्यांमध्ये तज्ज्ञ म्हणून काम केले आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांच्यासह या क्षेत्रातील अनेकांनी जाधव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 'खूपच दु:खद बातमी आहे. लस निमिर्तीमध्ये त्यांनी आयुष्यभर मोठं योगदान दिलं आहे.' असं स्वामीनाथन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT