NCP-Shivsena-Congress
NCP-Shivsena-Congress Sarkarnama
पुणे

...तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू : शिवसेना नेते सचिन अहिर

सरकारनामा ब्यूरो

देहू : आगामी देहू नगरपंचायतीच्या (Dehu Nagarpanchayat Election-2021) निवडणुकीसाठी राजकीय हालचालीस चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) बरोबर समझोता झाला नाही तर, कॉंग्रेस (Congress) पक्षाकडून आघाडीचा प्रस्ताव आल्यास कॉंग्रेसला बरोबर घेवून देहू नगरपंचायतीची निवडणूक लढवू, असे सुतोवाच शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शुक्रवारी (ता.3 डिसेंबर) देहू येथे दिले.

देहू नगरपंचायतीची निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छुकांची मुलाखत देहूतील संतकृपा मंगल कार्यालयात घेण्यात आल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. मेळाव्यानंतर अहिर हे माध्यमांशी बोलत होते.

सचिन अहिर म्हणाले, पीएमआरडीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्याबरोबर आघाडी केली. त्यावेळी आम्ही त्यांच्या उमेदवारांना मदत केली. देहूतील नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेने बरोबर आघाडी होण्यास विलंब होत आहे. खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनिल शेळके यांची याबाबत येत्या दोन दिवसात चर्चा होईल. तुर्तास नगरपंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आघाडीचा प्रस्ताव दिल्यास आघाडीसाठी आम्ही तयार आहोत. मात्र, अद्याप तसा प्रस्ताव आलेला नाही.

दरम्यान नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडे 12 जणांनी उमेदवारी मागितली आहे. यावेळी देहू शहर शिवसेना प्रमुख सुनिल हगवणे, बाबा भालेकर, रमेश हगवणे, राजेंद्र काटे, रमेश जाधव, लतिका फास्ते, राजेश पळसकर, राजेश खांडभोर, नगरसेविका कल्पना आखाडे, शैला खंडागळे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT