vanraj andekar  sarkarnama
पुणे

Vanraj Andekar : वनराज आंदेकरांचा गेम करणारा मास्टरमाईंड कोण? कधीपासून शिजत होता कट?

सागर आव्हाड

Vanraj Andekar Latest News : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री सुमारास नाना पेठेतील राहत्या घराजवळ गोळ्या झाडून कोयत्यानं वार करून खून केल्यानं खळबळ उडाली.

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. याप्रकरणी मास्टरमाईंड कोण? कधीपासून हत्येचा 'प्लॅन' सुरू होता? याची माहिती समोर आली आहे.

वनराज आंदेकरच्या खूनप्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. सोमनाथ कोमकर, जयंत कोमकर, सोमनाथ उर्फ सोम्या गायकवाड, असं तीन जणांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील दोन आरोपींना विश्रामबाग पोलिस ( Police ) स्टेशनच्या निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकाने अटक केली आहे. तर, सोम्या गायकवाडला टेंभूर्णीतून ताब्यात घेतलं आहे.

पोलिस सूत्राकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट दीड ते दोन महिन्यांपासून शिजत होता. अटक करण्यात आलेल्या तीन जणांमधील सोम्या गायकवाड हा वनराज आंदेकर यांच्या खूनाचा मास्टरमाईंड आहे. तर, सोम्या गायकवाड हा पूर्वी आंदेकर टोळीत सक्रिय होता.

रविवारी काय घडलं?

नाना पेठेतील डोके तालीम चौक येथे आंदेकर यांचे घर आहे. रविवारी रात्री साठेआठच्या दरम्यान वनराज घराच्या परिसरात उभे असताना एक टोळके दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर खासगी रूग्णालयात आंदेकर यांना दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

( Edited BY : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT