Devendra Butte Patil- Adv Rajesh Kandge
Devendra Butte Patil- Adv Rajesh Kandge Sarkarnama
पुणे

शिक्षण मंडळाच्या वर्चस्वावरून दोन माजी आमदारांचे चिरंजीव आले आमने सामने!

हरिदास कड

चाकण (जि. पुणे) : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्चस्वावरून खेडच्या दोन माजी आमदारांच्या चिरंजीवांमध्ये वाक्‌युद्ध रंगले आहे. खेडचे माजी आमदार (स्व.) साहेबराव बुट्टे पाटील यांचे चिरंजीव आणि मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र साहेबराव बुट्टे पाटील आणि माजी आमदार ॲड. राम कांडगे यांचे चिरंजीव, ॲड. राजेश कांडगे हे दोघे शिक्षण मंडळावरून आमने सामने आले आहेत. या दोघांनी आपणच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असल्याचे सांगून आपापली कार्यकारिणीही जाहीर केली आहे. (Sons of two former MLAs came face to face with dominance of Khed Education Board!)

ॲड राजेश कांडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली आहे. तसेच, कार्यकारिणी सदस्यांचीही निवड करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सध्या नेमके अध्यक्ष कोण आहेत, असा प्रश्न तालुक्यात चर्चिला जात आहे.

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा तीस सप्टेंबर रोजी झाली. या सभेत एकमताने अध्यक्षपदी माझी (ॲड. राजेश कांडगे) यांची तसेच, एकोणीस सदस्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी बदलाचा ठराव माझी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धर्मदाय आयुक्तांकडे दिला आहे. तसेच, विविध बॅंकांमध्ये पत्रेही दिली आहेत, असे ॲड. राजेश कांडगे यांनी सांगितले.

अध्यक्ष म्हणून ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी त्यांची स्वतंत्र कार्यकारिणी यापूर्वीच जाहीर केलेली आहे. त्यामुळे नक्की कोणती कार्यकारिणी खरी असा प्रश्न तालुक्यातील नागरिक, सदस्य, सभासदांना पडला आहे. ॲड. कांडगे यांनी यापूर्वीचे अध्यक्ष यांनी संस्थेत गैरप्रकार केल्याचा आरोपही केला आहे. आमदार दिलीप मोहीते यांनीही संस्थेत गैरप्रकार झाल्याचे आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेवेळी ॲड. राजेश कांडगे, कार्यकारिणी सदस्य उमेश आगरकर व इतर उपस्थित होते. या वेळी कांडगे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रती व इतर कागदपत्रेही सादर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT