Eknath Khadse, Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Eknath Khadse: नाथाभाऊंचा भाजप प्रवेश; रोहितदादा म्हणाले, "तर खडसेंनाही तुरुंगात टाकलं असतं..."

Sudesh Mitkar

Rohit Pawar On Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भारतीय जनता पक्षात (BJP) घरवापसी होणार आहे. मागील काही दिवसांपासून खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांना खुद्द एकनाथ खडसेंनी पूर्णविराम दिला आहे. केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करून मी दिल्लीत जाऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खडसेंनी दिली आहे.

खडसेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. तर खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर सडकून टीका केली.

पवार म्हणाले, मी खडसेंबद्दल (Eknath Khadse) बोलणार नाही, त्यांच्या अडचणी खूप आहेत. भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकतं, सध्या खडसेसाहेबांची तब्येत खूप खराब आहे अशा परिस्थितीत भाजप त्यांना जेलमध्येही टाकू शकतं. तुरुंगामध्ये टाकले असते तर त्यांची तब्येत खालावली असती. या काळजीपोटीच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार केला असावा असं पवार म्हणाले.

तर भाजपने असे खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली आहे. अनेक नेत्यांना भीती दाखवली जात आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं, खोट्या फाईल काढून केजरीवालांना (Arvind Kejriwal) तुरुंगात टाकलं तसाच प्लॅन खडसेंबाबत केला असावा, असा आरोप रोहित पवारांनी भाजपवर केला.

यावेळी रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीका केली. फडणवीस साहेब आता वैतागले आहेत. फडणवीस राज्याचे नेते असूनही विनोद तावडे साहेबांकडे महाराष्ट्र राज्याचे सगळे अधिकार जात आहेत. राज्यातले सगळे मोठे निर्णय ते घेत आहेत. त्यामुळे फडणवीसांचं राजकीय वजन कमी होत असल्याने ते अशी विधाने करत असून फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरले असल्याचंही पवार म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपात (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यातच त्यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीचा फोटोही समोर आला होता. त्यानंतर आता खडसेंनी स्वत: आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधान परिषदेवर आमदार आहेत.

(Edited By Jagdish Patil)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT