Congress News Sarkarnama
पुणे

Congress Party Meeting: राजकीय घडामोडींना वेग : काँग्रेसने बोलवली तातडीची बैठक; विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार?

Maharashtra Politics: काँग्रेसने राज्यातील प्रमुख नेत्यांची उद्या (दि.4 जुलै) मंगळवारी बैठक बोलावली.

सरकारनामा ब्यूरो

Congress Opposition Leader: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यातील प्रमुख नेत्यांची उद्या (दि.4 जुलै) मंगळवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एस के पाटील उपस्थित राहणार आहे.

विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. तसेच विरोधी पक्षनेतेपदी कुणाचे नाव समोर येणार? यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे प्रभारी एस.के.पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अजून काही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

गेल्या 13 महिन्याच्या आत महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष भाजपने फोडले असल्याने आता काँग्रेस ॲक्टिव मोडवर आली आहे. त्याच अनुषंगाने काँग्रेसने या बैठकीचे आयोजन केलं असल्याची चर्चाही सुरू आहे. याबरोबरच काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये काँग्रेसची पुढील राजकीय भूमिका काय असणार? यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळावे, यासाठी दावा करण्यात येत आहे. तसेच विधिमंडळात सध्या काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष आहे. काँग्रेसकडे सध्याच्या परिस्थितीत 44 आमदार आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे कुठलेही संविधानिक पद नाही, त्यामुळे आता विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसला देण्यात यावे, याकरिता राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दावे आणि लॉबिंग सुरू केली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला हवं असल्याने त्यासाठी काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली हायकमांकडं लॉबिंग सुरू केली आहे. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांचे नावे चर्चेत आहेत.

सध्या विधिमंडळात काँग्रेसचे 44, शिवसेना ठाकरे गटाचे 13 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार आहे. मात्र, अजित पवार यांच्यासोबत किती आमदार गेले, या संदर्भात अद्याप माहिती नसल्याने नेमके शरद पवार यांच्या बाजूने किती आमदार आहेत, हे नेमकं आता सांगता येणार नाही.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT