सरकारनामा ब्यूरो
पुणे : देशातील राज्य सहकारी बँकांमध्ये क्रमांक एकवर असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने ३० सप्टेंबर २०२१ अखेरील सहा महिन्यांमध्ये ४०२ कोटींचा विक्रमी निव्वळ नफा कमावलेला आहे. गतवर्षीच्या ३० सप्टेंबरअखेरील नफ्याच्या तुलनेत ही वाढ १३६ टक्के इतकी भरीव आहे, अशी माहिती राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अनास्कर यांनी ३० सप्टेंबर २०२१ अखेरील बँकेच्या सहामाही आर्थिक स्थितीची माहिती दिली. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, सरव्यवस्थापक दिलीप दिघे आणि अनंत भुईभार या वेळी उपस्थित होते.अनास्कर म्हणाले, ‘‘ ३० सप्टेंबर २०२१ अखेर बँकेचे नेटवर्थ तीन हजार ६७ कोटी रुपयांवर गेले असून, तीन हजार कोटींचा टप्पा पार पाडणारी देशातील ही एकमेव राज्य बॅंक ठरली आहे.
बँकेचा स्वनिधी पाच हजार ५९२ कोटींवर गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ १७ टक्के इतकी आहे. बँकेच्या व्याजाचे निव्वळ उत्पन्न ४९५ कोटी इतके असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये १३५ टक्के इतकी वाढ झालेली आहे. पहिल्या सहा महिन्याअखेर बँकेचा व्यवसाय ३४ हजार ९७७ कोटी इतका असून, बँकेच्या ठेवी १६ हजार ३७० कोटी आणि कर्ज १८ हजार ६०७ कोटी इतके आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेचे रिटर्न ऑन असेटस् २.७० टक्के असून, त्याचे आदर्श प्रमाण केवळ एक टक्का आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ १.६७ टक्के इतकी आहे. बँकेच्या संरक्षक तरतुदीचे गुणोत्तर (प्रोव्हिजन कव्हरेज रेशो) ९१ टक्के इतके मजबूत आहे. अशा प्रकारे ३० सप्टेंबर अखेर अर्धवर्षात बँकेने सर्वच निकषांवर भरीव प्रगती केली आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.