Rupali Chakankar Latest Marathi News Sarkarnama
पुणे

रुपाली चाकणकर यांचा मास्टरस्ट्रोक; खडकवासला मतदारसंघात इतिहास घडणार

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याअंतर्गत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुण्यातील खडकवासला मतदारसंघात इतिहास घडणार आहे. मतदारसंघातील 29 ग्रामपंचायती व चार प्रभागातील नागरिकांनी एकाच दिवशी तसा ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. (Rupali Chakankar Latest Marathi News)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हेडवाड या गावातील विधवांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव ग्रामसभेने मागील महिन्यात पारित केला आहे. त्यानंतर राज्यातील आणखी काही गावांनी असं पाऊल उचललं. रुपाली चाकणकर यांनीही याबाबत आवाहन केलं होतं.

त्यानंतर आता चाकणकर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी पुढाकार घेतला आहे. चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व ४ प्रभागातील नागरिकांनी गुरूवारी (दि.९ जून) रोजी एकाच दिवशी हा ठराव मंजूर करण्याचे ठरवले आहे.

अशा पद्धतीने १०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा खडकवासला हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ असेल. मध्यतंरी रुपाली चाकणकर यांच्या काकांचे निधन झाल्यानंतर आपल्या काकूचे कुंकू न पुसता, मंगळसुत्र न काढता विधवा प्रथा बंदीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती. आता याच्याही पुढे जात आपला संपूर्ण मतदारसंघ विधवा प्रथामुक्त त्या करत आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT