Pune Police Sarkarnama
पुणे

Pune Police: धक्कादायक: पुण्यात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

Mangesh Mahale

Pune News: पुण्यात निवृत्त पोलिस निरीक्षकावर दगडाने हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

वजीर शेख असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी वानवडी परिसरात वजीर शेख यांच्यावर हल्ला झाला. त्यांना दगडाने ठेचण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांचे नाव अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. वानवडी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT