BJP-NCP
BJP-NCP Sarkarnama
पुणे

खडकवासल्यातील २४ जागांवर प्रबळ दावेदारांची भाजपा-राष्ट्रवादीला डोकेदुखी ?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या प्रभागांमधील चित्र स्पष्ट झाले असून आता आजी-माजी नगरसेवकांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. खडकवासला मतदारसंघातील २४ प्रभागांमध्ये राष्ट्रवादीबरोबरच भाजपाचेदेखील (NCP-BJP)वर्चस्व असल्याने या दोन्ही पक्षातील मातब्बरांना सामावून घेताना दोन्ही पक्षातील वरिष्ठांची कसरत होणार हे निश्‍चित.

या मतदारसंघात आठ प्रभाग आहेत. आठ प्रभागांतून २४ नगरसेवक निवडून येणार आहेत. यापैकी १२ जागा खुल्या गटासाठी तर अन्य बारा जागा खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आहेत. या मतदासंघात नव्या गावांचा समावेश झाला आहे. परिणामी ग्रामीण भाग जोडण्यात आल्याने प्रभागांचा आकार बऱ्यापैकी मोठा आहे. प्रत्येक मतदारसंघात जुन्यांबरोबर नव्या इच्छुकांनी दावेदारी सुरू केली असल्याने दोन्ही प्रमुख पक्षात इच्छुकांची संख्या वाढणार आहे.

विशेष म्हणजे या मतदारसंघातील आठ प्रभागांमध्ये अनुसूजित जाती तसेच अनुसूचित जमातीसाठी एकही जागा आरक्षणात मिळाली नाही. वारजे-कोंढवे धावडे या प्रभाग क्रमांक ३४ मध्ये एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी तर दोन जागा खुल्या गटासाठी आहे. प्रभाग ३५ रामनगर-उत्तमनगर-शिवणे या प्रभागात जवळपास हीच परिस्थिती आहे. प्रभाग ५१ वडगाव-माणिकबाग या प्रभागात एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी. दोन जागा खुल्या गटासाठी आहेत.

प्रभाग ५३ खडकवासला-नऱ्हे या प्रभागात दोन जागा खुल्या गटातील महिलांसाठी. एक जागा खुल्या गटासाठी आहे. या प्रभागात भाजपाचे विद्यमान नगरसेवक असले तरी या भागात राष्ट्रवादीला मानणारा वर्ग मोठा आहे. दोन्ही पक्षाकडून या प्रभागातदेखील प्रबळ दावेदारांची संख्या मोठी आहे. प्रभाग ५६ चैतन्यनगर-भारती विद्यापीठ या प्रभागात एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी, तर दोन जागा खुल्या गटासाठी आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीबरोबरच भाजपाची ताकद मोठी आहे.

नांदेड-सनसिटी प्रभाग ५२ मध्ये दोन जागा खुल्या गटातील महिलेसाठी व एक जागा खुल्या गटासाठी आहे. या प्रभागात भाजपाचे वर्चस्व असल्याने कोणातही उमेदवार आला तरी निवडून येण्यास अडचण नाही. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांबरोबरच नव्या अन्य नावांचा विचार येथे होऊ शकतो.प्रभाग 55 धनकवडी-आंबेगाव पठार या प्रभागात दोन जागा खुल्या गटातील महिलेसाठी व एक जागा खुल्या गटासाठी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT