पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. 
पुणे

कोरोना इफेक्ट : परिक्षांबाबत निर्णय होत नाही तोपर्यत विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता येणार - पुणे जिल्हाधिकारी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांसंदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहता येणारआहे.- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी पुणे

सरकारनामा ब्युरो

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांसंदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहता येणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.


पुण्याच्या काही भागात १४४ कलम म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा विचार आहे. मात्र त्याबाबत लवकरच आदेश दिले जातील. मॉल्समधील मेडिकल, किराणा आणि भाजीपाला दुकाने सुरु राहणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

कालच्या पाच रुग्णांपैकी चार कोरोनाबाधित परदेशी गेलेले नव्हते. चौघेही परदेशी गेलेल्या बाधितांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. काल परदेशातून आलेल्या तिघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असल्याने त्यांना नायडूत उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, की आतापर्यंत ३१५ सॅम्पल पाठवले. २९४ रुग्ण निगेटिव्ह, १५ कोरोनाबाधित तर २१ जणांचे अहवाल बाकी  अद्याप बाकी आहेत. लोकांनी आपली घरे सोडू नयेत . कालच्या पाच कोरोनाबाधितपैकी एक जण थायलंडहुन आला होता. त्याच्यासोबत ९३ जणांचा ग्रुप होता, सर्वांना ट्रॅक करण्यात यश आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT