Suicide of a married woman over an airport land money 
पुणे

पुरंदर विमानतळ कागदावरच पण जमिनीच्या पैशाने घेतला विवाहितेचा बळी

'तुझ्या वडिलांना विमानतळाचे किती पैसे मिळणार आहेत' असं म्हणत तिच्या पतीकडून सतत पैशाची मागणी केली जात होती.

सरकारनामा ब्युरो

सोमेश्वरनगर (ता. बारामती) : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ अजून कागदावरच आहे. स्थानिकांच्या विरोधामुळं अद्याप तळ्यात-मळ्यात सुरू आहे. पण विमानतळाच्या प्रस्तावित ठिकाणाच्या परिसरात जमिनींचे भाव वाढले आहेत. यातूनच निर्माण झालेल्या एका कौटूंबिक वादातून एका विवाहितेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. (Suicide of a married woman over an airport land money)

स्वाती जयजीत काकडे (वय 31) या महिलेने सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. 'तुझ्या वडिलांना विमानतळाचे किती पैसे मिळणार आहेत' असं म्हणत तिच्या पतीकडून सतत पैशाची मागणी केली जात होती, असे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. स्वाती काकडे यांचे सासर बारामती तालुक्यातील निंबुत येथील तर पुरंदर तालुक्यातील नायगाव हे त्यांचे माहेर आहे. 

पती जयजीत काकडे यांच्यासह सासरच्यांकडून त्यांचा सतत छळ केला जात असल्याची फिर्याद स्वाती यांचे बंधून संतोष बाळासाहेब कड यांनी जेजुरी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार जयतीत काकडे, सासू मीनाक्षी अरूण काकडे व सासरे अरूण भगवान काकडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जेजुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री माहेरी घराजवळीत विहीत उडी मारून स्वाती यांनी आत्महत्या केली. 

 तुझे वजन जास्त आहे. तू रोज एकच चपाती खा, असे म्हणत स्वाती यांना उपाशीही ठेवले जात होते. लग्नात माहेरकडून कुलर, वॉशिंग मशिन अशा मोठ्या वस्तू दिल्या नाहीत. वडीलांना विमानतळाचे पैसे मिळणार आहेत, असे म्हणत सतत पैशांची मागणी केली. आम्ही काकडे देशमुख आहोत, आमच्या शेजारी बसायची लायकी नाही, असा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला, असे फिर्यादीत म्हटलं आहे.

शुक्रवारी स्वाती या माहेरी असताना पतीने दिवसभर फोन करून त्रास दिला. रात्री नऊ वाजताही पतीने फोनवरून वाद घालत मानसिक छळ केला. त्याच रात्री स्वाती यांनी शेतातील विहीरीत उडी मारून आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी रविवारी सायंकाळी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप ताब्यात घेतले नसल्याचे तपास अधिकारी फौजदार एस. ई. सोनवलकर यांनी सांगितले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT