Sunetra Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुण्यात होणाऱ्या या बैठकीला उपस्थित न राहता सुनेत्रा पवार या तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
देशाचे गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईत आहेत. त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला पवार या देखील उपस्थित राहणार असल्याने त्या मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्यसभेची निवडणूक अवघ्या 15 दिवसांनी होणार आहे. पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारांची नावे निश्चित करणयात येत आहेत. त्यामुळे या निवडणुकीसंदर्भात सुनेत्रा पवार आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज पार पडली. सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीमध्ये ही बैठक झाली. बैठकीला आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर, मंत्री दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच अंतिम निर्णय सुनेत्रा पवार या घेतील असे सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.