sangram-thopte-anant-thopte
sangram-thopte-anant-thopte 
पुणे

संग्राम थोपटे यांचे समर्थक शांत होण्याचे नाव नाही....भोरचे नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत

विजय जाधव

भोर : मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भोर नगरपालिकेतील नाराज झालेले  सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी मुंबईला गेले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे राजीनामे देण्यासाठी आम्ही मुंबईला आलो असल्याचे नगराध्यक्षा निर्मला आवारे उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते सचिन हर्णसकर  व सर्व नगरसेवकांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाचे बोर्ड जाळून  आपला निषेध नोंदविला होता. त्यावेळी त्यांनी  सामूहिक राजीनामा देण्याचे जाहीर केले होते.

भोर नगरपालिकेत संपूर्ण सत्ताही काँग्रेसची असून १७ नगरसेवक एक नगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत नगरसेवक असे एकूण वीस जण सध्या बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयात थांबले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. भोर तालुक्यातील नाराज  असलेल्या काँग्रेस कमिटीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी राजिनामे पाठविले असून सर्व समित्या बरखास्त केलेल्या आहेत. याशिवाय काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात जाऊन आपला निषेध नोंदविला होता.

मंत्रिमंडळ विस्तारात अखेरच्या क्षणी कोणते मानते घडले आणि संग्राम थोपटे यांचे नाव वगळण्यात आले, याबाबत बाळासाहेब थोरात यांना जाब विचारला जाणार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या समवेत नगरसेवकांची बैठक सध्या सुरू असून भोर तालुक्यातील काँग्रेस प्रेमींची नाराजी दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरात काय उत्तर देतील याची उत्सुकता लागलेली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT