supriya sule latest news sarkarnama
पुणे

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन राजकारण पेटलं ; राष्ट्रवादी शिंदे गटाचं सर्व कसं OK करणार, पोलिसात तक्रार

supriya sule : आघाडी सरकारच्या काळातला फोटो शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्या आहेत असं दिसतं आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यात सत्तातर झाले, एकनाथ शिंदे (eknath shinde) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, त्यानंतरही या खुर्चीवरील वाद अद्याप संपलेला दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे.

शुक्रवारी खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसले आहेत, असा फोटो राष्ट्रवादीनं व्हायरल केला. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला होता. श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं खोचक टि्वट त्यांनी ही केलं होतं.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे (supriya sule) या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या आहेत असा फोटो टि्वट केला. या फोटोवरून राजकारण रंगलं आहे. या फोटोवरुन राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने आता पोलिस ठाणे गाठले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातला फोटो शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्या आहेत असं दिसतं आहे. त्यांच्या शेजारी तत्कालीन आरोग्य मंत्री असलेले राजेश टोपे आणि तत्कालीन गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसतं आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावर ट्विट करत हा फोटो बघा कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय? असा प्रश्न विचारत शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केला आहे.

सुप्रिया सुळे यांचा जो फोटो वापरण्यात आला आहे तो फोटो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सन 2022 मधील एका कार्यक्रमातील आहे, याचा पुरावा म्हणून तो फोटो आदिती नलावडे यांनी टि्वट केला. राष्ट्रवादीने याबाबत सायबर पोलिसांकडे शीतल म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलं आहे. म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. … आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत पोलीस असं ट्विट करत वरळी पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंच्या विरोधात केलेली तक्रार आदिती नलावडे यांनी ट्विट केली आहे.

आता फोटोशॉप सेना

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणकुमार बिरादार यांनीही याच फोटो संदर्भात टि्वट करत ओरिजनल फोटो काय आहे आणि त्याचं मॉर्फिंग कसं केलं गेलं आहे ते ट्विट केलं आहे. एवढंच नाही तर शिंदे गटावर टीकाही केली आहे. वाण नाही पण गुण लागला,शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली आहे. हा घ्या पुरावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT