Supriya Sule 1 Sarkarnama
पुणे

Supriya Sule : मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट मिस मॅच! सुप्रिया सुळे कोर्टात जाण्याच्या तयारीत

NCP MP Supriya Sule Maharashtra CM Devendra Fadnavis Pune Deenanath Mangeshkar Hospital : पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नसल्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणांमध्ये संबंधित डॉ. सुश्रुत घैसासांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप रुग्णालय प्रशासनावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

चार अहवाल आल्यानंतर देखील रुग्णालय प्रशासनावर कारवाई टाळाटाळ करण्यात येत असल्याने विरोधकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यामध्ये (Pune) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. हा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न आहे का? गुन्हा उशिरा का होईना दाखल झाला त्याचं मी स्वागत करते. महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही हीच आमची भूमिका आहे. मात्र या प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे याबाबत आम्ही कोर्टात देखील धाव घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे याबाबत कोर्टात जाणार आहेत.

या घटनेसाठी जे जबाबदार असतील त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. या प्रकरणात पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्टेटमेंट केलं होतं.माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या की मुख्यमंत्री आपल्या लेकीला न्याय देतील.मात्र पहिल्या दिवशी त्यांनी जी स्टेटमेंट केलं आणि आज त्यांचं जे स्टेटमेंट आहे यात मिस मॅच आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून चार अहवाल तयार करण्यात आले आहेत. मात्र या अहवालामध्ये अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर फोकस राहणं आवश्यक आहे.कुठला अहवाल काय म्हणतो यात अडकायला नको असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बीडमधील महिला वकील मारहाण...

बीडमधील वकील महिलेला मारहाण प्रकरणांमध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बीडमध्ये नक्की काय सुरू आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा बीडमध्ये बदल होताना दिसत नाही. चालक असलेल्या एका तरुणाचं किडनॅपिंग झाली असल्याची बीड मधील एक घटना माझ्यासमोर आली आहे. याबाबत पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने या तरुणाच्या कुटुंबातील सदस्य माझ्या भेटीला आले होते. या बाबत मी पोलीस अधीक्षकांची बोलले आहे. मात्र बीडमध्ये दहशत नेमकी कुणाची आहे. की बीडमध्ये वर्दीला देखील कुणी घाबरत नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली

ठाकरे बंधू युतीवर आनंद...

ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा वर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला आनंदच आहे. कुठलाही कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. कुटुंब एकत्र झाला आहे. त्याचा आनंद साजरा करू द्या. हा संस्कृत महाराष्ट्र आहे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटावा हीच आपली संस्कृती असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT