Supriya Sule, Nirmala Sitharaman
Supriya Sule, Nirmala Sitharaman sarkarnama
पुणे

Supriya Sule : बारामती सगळ्यांनाच हवीहवीशी आहे, निर्मला सीतारामन यांचे मी स्वागत करेन !

सरकारनामा ब्युरो

पुणे : भाजपने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती (Baramati) मतदारसंघावर आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना घेरण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपने 'मिशन बारामती' हाती घेतलं आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्टीकरण दिले. त्या आज पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

पेट्रोल, डिझेल, सीनजी, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने आज पुण्यातील कोथरूड परिसरात जनआक्रोश आंदोलन केले. घरगुती वापराच्या वस्तूवर लावलेल्या जीएसटीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सरकारचा निषेध केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, " उद्या निर्मला सीतारामन बारामतीत त्यांच्या पक्षाचा प्रचार केला तरी मी त्यांचे स्वागत करेन. त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. मनसेनेदेखील त्यांचा प्रचार करावा. आम्हाला काहीही अडचण नाही. मला आनंदच होईल. बारामती सगळ्यांनाच हवीहवीशी आहे. हे याचेच प्रमाणपत्र आहे,"

"निर्मला सीतारामन यांनी बारामतीत येऊन त्यांच्या पक्षाचा प्रचार केला तरी मी त्यांचे स्वागत करेन. त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. मनसेनेदेखील त्यांचा प्रचार करावा. आम्हाला काहीही अडचण नाही. मला आनंदच होईल. कारण माझे माझ्या मतदारसंघावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे जो लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला पुढे घेऊन जाईल, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. म्हणूनच तर संविधान आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणतात एक पार्टी एक देश. आमचे त्याच्या उलट आहे. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. एक देश आणि अनेक पक्ष राहिलेच पाहिजेत," असे सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीचे वृत्त काही माध्यमामध्ये प्रसिद्ध झाले आहे. याबाबत सुळे म्हणाल्या, "रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत,"

"माझे रोहित यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांना अद्याप नोटीस आलेली नाही. पण आमच्यापैकी कोणालाही नोटीस आली तर आमची नेहमी सहकार्याची भूमिका राहिलेली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला लपवायची काही गरज नाही. त्यामुळे अशी काही चौकशी झाली तर आम्ही उत्तर देऊ,आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तरी आमची सहकार्याचीच भूमिका असते, " असे त्यांनी सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT