Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule Vs Chhagan Bhujbal : बारामतीतून फोन गेला म्हणणार्‍या भुजबळांना सुप्रिया सुळेंचे खुलं चॅलेंज; म्हणाल्या...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित केलेल्या बैठकीला विरोधक आले नाहीत. त्यांना अचानक बारामतीतून फोन आला आणि त्यांनी ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बोलावलेल्या बैठकीला येणे टाळले, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी केला. यावर खासदार सुप्रिया सुळेंनीही पुरावे द्या, असे आव्हान भुजबळांना केले आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला विरोधकांनी ऐनवेळी टांग मारल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक मराठा आणि ओबीसी समाजात वाद पेटवण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसन्मान महामेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी भुजबळांनी मराठा आरक्षणाबाबत अप्रत्यक्षपणे ज्येष्ठ नेते शरद पवारांवर Sharad Pawar निशाणा साधला. 'मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. बैठकीला विरोधी पक्षनेते येण्यास तयार होते. मात्र, ऐनवेळी संध्याकाळी बारामतीवरून फोन गेला आणि विरोधी पक्षांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, असा घणाघात भुजबळ यांनी केला.

आरक्षणाचे भांडण मिटावे म्हणून सरकारने बैठक बोलावली. सर्व पक्षाच्या नेत्यांनी यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी येणे क्रमप्राप्त होते. राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर काही प्रश्न निर्माण होतात, त्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते येणे अपेक्षित होते. मात्र बारामतीमधून फोन आला आणि विरोधी पक्षांनी ऐनवेळी बैठकीवर बहिष्कार टाकला, असा आरोप भुजबळांनी केला.

तुमचा राग आमच्यावर असेल, ओबीसी समाजाने तुमचे घोडे मारले का? तुम्ही का येत नाही? तुम्ही आमच्या बरोबर येत नाही, पाठीमागून मात्र सल्ले द्यायचे. त्यातून महाराष्ट्र पेटवण्याचे प्रयत्न करायचे, अशी टीकाही भुजबळांनी केली.

भुजबळांच्या या आरोपांना शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी Supriya Sule जशास तसे उत्तर दिले आहे. बारामतीतून फोन गेला याचा पुरावा आहे का भुजबळांकडे? सीडीआर काढून बघू ना, कुणी कुणाला फोन केला ते. बैठकीबाबत आम्ही प्रस्ताव मागितला होता. त्यासाठी मी स्वतः बोलले होते. आता त्यांनी आमंत्रण कुणाला दिले हे मला माहिती नाही.

आता माझे एवढेच म्हणणे आहे, की 'पहले आप पहले आप' असे कशाला करत बसता. या सरकारला खरेच आरक्षण द्यायचे असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुणालाही एक फोन करावा, आणि मिटिंग करावी. त्यात त्यांना काय अडचण आहे. गेल्या दहा वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मी आग्रही आहे. हे लोक आता आलेत, असा टोलाही सुळेंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT