पुणे

सुप्रिया सुळेंचा ट्विटरवर प्रतिसाद! किरकटवाडीतील रस्त्यासाठी कलेक्टरांकडे बैठक

सरकारनामा ब्यूरो

पुणे : किरकटवाडी-नांदोशी रस्त्याचा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला प्रश्न किरकटवाडी-नांदोशी विकास फोरमने ट्विटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडला. त्याची तत्काळ दखल घेत खासदार सुळे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रश्‍नातून मार्ग काढण्यासाठी येत्या सोमवारी बैठक बोलवली आहे. 

ट्विटरच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेला इतक्या तातडीने मिळालेल्या प्रतिसादामुळे विकास फोमचे पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.

या संदर्भात बोलताना किरकटवाडी-नांदोशी फोरमचे सदस्य प्रफुल्ल पेटकर म्हणाले, "" आमच्या रस्त्याचा प्रश्‍न मोठा बिकट आहे. नांदोशी, सणसवाडी, किरकटवाडी या भागात जवळपास 10 हजार लोकसंख्या आहे. मात्र रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. मार्च महिन्यात खासदार सुळे यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

आम्ही ट्विटरवर खासदार सुळे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेकांना हा विषय कळविला होता. मात्र खासदार सुळे यांनी  दखल घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क करून येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या माध्यमातून आमचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा पेटकर यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT