Sharad Pawar, Supriya Sule sarkarnama
पुणे

सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचे केले एका शब्दात वर्णन; म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची मुलाखत

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule : पुणे : शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल तुम्ही एका कार्यक्रमात अन्‌प्रिडिक्‌टेब्‌ल्‌ असे व्यक्तीमत्त्व आहे, असे म्हणाला होतात. आता जर त्यांच्या सामाजिक जीवनाबद्दल एका शब्दांत सांगायचे असेल तर काय सांगाल, या प्रश्नाचे उत्तर देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, मी वडिलांना अन्‌प्रिडिक्‌टेब्‌ल्‌ म्हणाले होते, तेव्हा मी २१ वर्षांची होते. आता ५२ वर्षांची आहे. आता मी म्हणेन 'स्ट्रॉंग' हा एकच शब्द आहे त्यांचे वर्णन करायला.

पुणे डॉक्टर्स असोसिएशनचा वतीने एक मुलगी असणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी शरद पवार व सुप्रिया सुळे यांना पवारांचीच एक जुनी मुलाखत दाखवण्यात आली. त्यामध्ये पवार म्हणतात की माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असे नाही. तिला इच्छा पण नाही. मुलाखतीची क्लिप पाहिल्यानंतर पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही खळखळून हसले. यानंतर पवार म्हणाले, सुप्रिया राजकारणात येईल असे वाटले नव्हते. मात्र, एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात, असे त्यांनी सांगितले.

सेलिब्रिटी वडील आणि मुलीचे नाते कसे असे या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, आम्ही काही प्लुटो किंवा नेपच्यून वरून आलो नाही. आम्ही नॉर्मल आहोत. माणसे माणसे असतात. लोक त्यांना सेलिब्रिटी बनवतात. पवार म्हणाले, माझ्यावर झालेल्या संस्कारांचे श्रेय माझ्या आईचे आहे. घरात कोणीच शिक्षित नव्हते. मात्र, आईने आम्हाला शिकवले. त्यामुळे माझा स्त्रियांविषयी विचार करण्याची मानसिकता तेव्हा पासूनच बदलली. यावेळी पवारांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

लोकसभेत महिला कमी का तर नेत्यांना वाटते की महिला निवडून यायची शक्यता कमी असते. तशी मानसिकता मतदारांनी ठेवली तर परिस्थिती बदलेल. राजकारणी सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात तर ते मतदारांना, असेही पवार म्हणाले. एखादा पुरुष नेता आणि स्त्री नेता यांच्यात काही फरक नाही. हे मार्गारेट थॅचर यांना भेटून जाणवले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पण व्यक्तिमत्व तसेच होते, असेही पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT