Baramati by-election news : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी सुप्रिया सुळे आपल्या भाषणात सुनेत्रा पवार यांना महाविकास आघाडीच्या वतीने शब्द दिला.
दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींनी भावुक झालेल्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज सर्वजण वहिनींच्या प्रचाराच्या सांगता सभेला आलो आहोत. आज दादा आपल्यात नाहीत, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. कामे होत राहतात, पण आयुष्यभर आपल्या घरातील एक कर्ता पुरूष, आपला भाऊ नाही, हे दु;ख आयुष्यभर असेल. हा कार्यक्रम प्रचंड दु;खाचा आहे.
वहिनींवर, त्यांच्या लेकरांवर मोठी जबाबदारी पडलीय. पार्थ आणि जय आमच्यासाठी अजूनही लहानच आहेत. पण तिघेही ज्यापध्दतीने जबाबदारी पार पाडत आहेत, ती अभिमानाची गोष्ट आहे. मी महाविकास विकास आघाडीच्या वतीने वहिनींना शब्द देते, महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि मतदार ताकदीने त्यांच्यासोबत उभे राहतील, असा शब्द सुप्रिया सुळे यांनी दिला.
पवार साहेबांना सहा दशके याच बारामतीकरांनी साथ दिली. ही परंपरा तुमच्या आशीर्वादने सुरू झाली. त्यानंतर दादांवर मोठी जबाबदारी आली. दादांनी पूर्ण निष्ठेने गेली ३५ वर्षे या भागाची सेवा केली. बारामतीकरांनी कधीही पवारांची साथ सोडली नाही. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन सगळ्यांना शब्द आणि शुभेच्छा द्यायला आली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच माझी इच्छा होती. पण काही लोकांचे फॉर्म राहिले. पण आता विक्रमी मतदान होईल, याबाबत शंका नाही. महाविकास आघाडी ताकदीने उभे राहील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दादांची स्वप्न आपण सर्वजण एकत्रितपणे पूर्ण करू. आमच्या सर्वांची मदत लागेल, ती सर्वजण करू. या संघर्षाच्या काळात, निवडणुकीत, बारामतीच्या विकासात सर्वजण एकत्र राहू, असे आवाहन करत सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्षष्ट केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.