Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule : भाजपची विधानसभेची तयारी; सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट, म्हणाल्या...

Devendra Fadnavis, Ajit Pawar : भाजपने 'ना खाऊंगा ना खाणे दूंगा', 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणत भ्रष्टाचारी नेत्यांना चक्की पसिंगचा इशारा दिला होता.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीत लोकसभेची कसर भरून काढण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची योजना जाहीर केली आहे.

या यात्रेची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपची भ्रष्टाचाराच्या भूमिकेवरून कोंडी केली. स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणाऱ्या पक्षाने यात्रेपूर्वी भ्रष्टाचाराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे खुले चॅलेंज सुळेंनी भाजपला केले आहे.

भाजप सरकारने 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' असे म्हणत देश आणि राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांना 'चक्की पिसिंग'चा इशारा दिला होता. त्यानंतर मात्र भाजपने इतर पक्षांतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच आपल्या गोटात सहभागी करून घेतले. या प्रकारामुळे जनतेत चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे भाजपने आता संवाद यात्रेपूर्वी आपली भ्रष्टाचाराची भूमिका काय आहे, हे एकदा स्पष्ट करावे, असे आवाहनच सुळेंनी Supriya Sule केले आहे.

राज्यातील भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वीच RSS ने देखील चिंता व्यक्त केली आहे. त्यातच आरएसएसच्या विवेक या मासिकातून लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीला उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले आहे. यावर सुळे म्हणाल्या, या मासिकात भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या युतीला नैसर्गिक म्हणत मान्यता दिली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे, असे थेट नमूद केले आहे.

विधानसभेपूर्वी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावरही सुळेंनी टीका केली. त्या म्हणाल्या, 'कॅग'ने राज्याची बिकट आर्थिक स्थिती असल्याचा अहवाल सादर केला आहे. आर्थिक स्थिती कमकुवत असतानाही सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक योजनांचा पाऊस पाडला. मतांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत, याकडेही सुळेंनी लक्ष वेधले. आता सरकारने जाहीर केलेल्या योजना या केवळ निवडणुकीसाठी केल्या नसून कायम असल्याचा विश्वास द्यावा, असे आवाहनही सुळेंनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT