Ajit Pawar, Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : सुप्रिया सुळेंनी मतदानानंतर थेट अजितदादांचं घर गाठलं; काय आहे कारण?

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात काँटे की टक्कर सुरू आहे. मतदारसंघात सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे. पवार कुटुंबातील मंडळींनी विविध ठिकाणी मतदान केले आहे. बारामतीत मतदानानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी थेट काटेवाडी येथील उपमुख्यमंत्री अजित पवारांचे घर गाठले. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामती राखण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार Sharad Pawar यांच्यात लोकसभा निवडणुकीनिमित्त मोठ चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे बारामतीत सर्व घडामोडींवर राज्यासह देशाचे लक्ष आहे. मतदानादिवशीच आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच सुप्रिया सुळेंनी थेट अजितदादांचे घर गाठल्याने चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे Supriya Sule म्हणाल्या, मी माझ्या काका, काकीच्या घरी गेले होते. ते माझेच घर आहे. माझ्या दोन्ही काकी, सुमती काकी व आशा काकी मतदानासाठी काटेवाडीत आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आले. आमच्या सगळ्या काक्या आमच्या आईच आहेत, अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली. आई-वडिलांना राजकारणात आणायचे नाही. अजित पवार Ajit Pawar यावेळी घरी होते की नाही ते मला माहिती नाही. राजकारण एका बाजूला आणि नाती एका बाजूला. सुप्रिया सुळे नेहमी नाती सांभाळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मतदानादिवशीच आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहे. अजित पवार गटाकडून मतदारसंघात पैशांचा मोठा वापर केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. रोहित यांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळले आहे. आम्ही पहिल्यापासून विकास कामासाठी झटत आहोत. कामांच्या माध्यमातूनच मतदारांंना समोरे गेल्याचेही त्यांनी स्पष्ट करत विरोधकांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष देत नाही, असे अजितदादांनी ठणकावून सांगितले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT