Pune News : एकूणच जगातील काही बड्या बँका डबघाईला जात असून, अशा बँकांना वाचवण्यासाठी सरकारला करदात्यांचे पैसे वापरावे लागत आहे. यामुळे आता मोठ्या मोठ्या बँकाना आणखी मोठे करण्यापेक्षा लहान सहकारी बँकाना आणखी मोठे करण्याऐवजी छोट्या सहकारी बँकांचे सक्षमीकरण घडवून आणल्यास, ते यशस्वी ठरेल. राष्ट्रीयकृत बड्या बँकाप्रमाणेच अद्ययावत तंत्रज्ञान, व्यवस्थापन इत्यादी संसाधने सहकारी बँकाना पुरवल्या पाहिजेत, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांना व्यक्त केले.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या (सीओईपी) सभागृहात ‘भगिनी निवेदिता सहकारी बँके’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभानिमित्तआयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, बँकेच्या अध्यक्षा डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा दीपा दाढे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. बँकेच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘सुवर्ण भरारी’ स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभू म्हणाले, "सहकारी बँकांची समाजाबद्दलची बांधिलकी आणि समाजासोबत असलेलं नात्याचा फायदा घेत, अशा बँकांचे सक्षमीकरण करायला हवे. अले केल्यास नवी समाजरचना तयार होण्यस मदत होईल. "
प्रभू पुढे म्हणाले, "बँकांनी जास्तीत जास्त महिलांना उद्योग-व्यवसायासाठी पैसा उपलब्ध करून, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास साहाय्य केले पाहिजे. याचा फायदा म्हणजे, अर्थव्यवस्थेच्या सदृढ होऊन, ती वाढीस होईल. समाजाचा तळागाळापर्यंत विकास साधायचा असेल तर सहकारी बँकांची गरज आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.