Sushma Andhare News: पुण्यामध्ये भर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडून कोयत्याने वार करण्यात आले. पुणे शहरात आणि राज्यभरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरताहेत का? झेपत नसेल तर राजीनामा का देत नाही?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
'मागील दहा वर्षांपैकी साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. याकाळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. फडणवीस गृहमंत्री असताना गुन्हेगारी वाढली. पुण्यामध्ये गुंडागर्दी वाढली. अंदेकरांवर हल्ला झालो तर दुसऱ्या दिवशी हडपसरमध्ये अजुन कोणावर हल्ला झाला. कोयता गँगने हैदोस घातला. पोलिसांवर कोयता गँगने हल्ला केला. कायदा सुव्यवस्था राहिली नाही', असे अंधारे म्हणाल्या.
सगळ्या घटना पाहिल्या तर या साडेसात वर्षात गँगवार वाढत चाललंय.वसई विरार, उरण येथील निर्घूण हत्या असतील. चिमुकीलींवर अत्याचार असतील. हे सगळं पाहिलं तर महिला देखील सुरक्षित नसल्याचे दिसते .गृहमंत्री म्हणून फडणवीस अयपशी ठरतायेत का? हा राजकारणाचा विषय नाही. हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. झेपत नसेल तर राजीनामा का नाही देत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारेंनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले त्या बाईला मी कोण आहे हे माहित आहे का? माझ्या नादाला लागू नको. मला घरात घुसून मारण्याची भाषा करताय. मी उद्धव ठाकरेंवर बोललो होतो तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला. तुमच्यावर पण होईल, असे राणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.