sushma andhare.jpg sarkarnama
पुणे

Sushma Andhare : मोठी बातमी! पवारसाहेबांच्या 2 मतदारसंघासह कोथरूडवर शिवसेनेचा दावा; भरसभेत अंधारेंची मागणी

Shivsena Shivsankalp Melava : पुणे येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी तीन जागांवरती दावा केला आहे. त्यांनी हा दावा करतात सभागृहात एकच जल्लोष करण्यात आला.

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच विधानसभेचे पडघम आता वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात उत्साह असून विधानसभा निवडणुकीत देखील आपणच बाजी मारू, असा विश्वास आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेते आग्रही असून विविध जागांवरती आपला दावा करत आहेत.

पुणे येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी तीन जागांवरती दावा केला आहे. त्यांनी हा दावा करतात सभागृहात एकच जल्लोष करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 'शिवसंकल्प मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तेव्हा, प्रेमापोटी विधानसभेला जास्तीच्या जागा मित्र पक्षांना सोडून नका, असं आवाहन अंधारेंनी वरिष्ठ नेत्यांना केलं आहे.

त्यासह वडगाव शेरी, कोथरूड आणि हडपसरच्या जागेची मागणी सुषमा अंधारेंनी यांनी केली. यानंतर सभागृहाच एकच जल्लोष करण्यात आला. तसेच, सभागृहातून जुन्नर आणि खडकवासल्याच्या जागेची मागणीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

हडपसर आणि वडगाव शेरी या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 2019 मध्ये निवडून आले आहेत. त्यामुळे या जागांवरती यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरदचंद्र पवार ) दावा केला आहे. यातच सुषमा अंधारेंच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेनेत ( ठाकरे गट ) यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांनी जागावाटताबाबत भाष्य करू नये, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर देखील अंधारेंनी हा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT