Medha Kulkarni Sushma Andhare Mahatma Phule Wada Vatsavitri  sarkarnama
पुणे

Andhare Vs Kulkarni : महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा,'...तो शुद्ध हलकटपणा,कारस्थान', मेधा कुलकर्णींवर सुषमा अंधारेंचा तीव्र संताप

Sushma Andhare Mahatma Phule Wada Vatsavitri : महात्मा फुले वाड्यात वटसावित्री पौर्णिमा साजरी करणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रहार केला.

Roshan More

Sushma Andhare News : पुण्यातील महात्मा फुलेवाडा येथे पुरोगामी संघटनांच्या विरोधानंतरही पुरातत्व विभागाच्या परवानगीने आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्थानिक महिलांसह पारंपारिक वटपौर्णिमा साजरी केली होती. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अंधारे म्हणाल्या की, 'मेधा कुलकर्णींनी जाणीवपूर्वक कोथरूड मधले सगळे वड सोडून ठरवून फुले वाड्यात येणे हा आचरटपणा नाही तो शुद्ध हलकटपणा होता. त्याहीपेक्षा एका ऐतिहासिक वास्तूमध्ये दरवर्षी ठरवून हेतूपुरस्सर चालवला जातो तरीसुद्धा त्यावर राज्याचे गृहमंत्री ठरवून दुर्लक्ष करतात हे सुनियोजित कटकारस्थान आहे.'

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अंधारे यांनी कुलकर्णी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, सध्या आमदार आणि खासदार अशा लोकांना केलं जात आहे जे जास्तीत जास्त गलिच्छ भाषा वापरू शकतात. जास्तीत जास्त दोन जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करू शकतात. ज्यांचा आणि विवेकाचा अजिबातच संबंध नाही आणि ज्यांचं कर्तृत्व शून्य आहे.'

'बोलघेवडेपणा आणि आक्रस्ताळेपणा ही जणू एक खास पद्धतीची पात्रता ठरलेली आहे. मेधा कुलकर्णी आणि तत्सम सुमार बुद्धिमत्तेच्या महिलांना, आणि एकूणच आमदार खासदारांना आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा यातला फरक ज्या दिवशी कळेल तो सुदिन समजावा!', असा टोलाही त्यांनी लगावला.

निकली हिंदुत्ववादी असण्यापेक्षा...

पुढे आपल्या पोस्टमध्ये अंधारे यांनी म्हटले आहे की, 'सध्या तरी मेधा कुलकर्णींचं हे वागणं मी जरा सकारात्मक घ्यायचं ठरवलं आहे. कदाचित असा नकली हिंदुत्ववादी असण्यापेक्षा क्रांतीबा ज्योतिबा फुलें सारखा महिलांचा सन्मान करणारा पत्नीला आदराचे स्थान देणारा आणि पावलोपावली तिची साथ देणारा आयुष्याचा जोडीदार आपल्याला मिळायला हवा किंबहुना ते गुण आपल्या वर्तमान जोडीदारांमध्ये यावेत यासाठी कोथरूड मधले सगळे वड सोडून फुले वाड्या तला वड मेधा कुलकर्णींना अधिक महत्त्वाचा वाटत असेल. मेधा कुलकर्णी जी तुमच्या यजमाना मध्ये ज्योतिबांचे गुण यावे त्याने तुम्हाला मा सावित्रीचा विवेक समजावून सांगावा.',

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT