Swargate rape case Datta Gade latest update Sarkarnama
पुणे

Dattatraya Gade: लेडी ब्लॅकमेलर दत्ता गाडे; लॉजबाहेर बसून असं शोधायचा सावज, महिलांचे छुपे व्हिडिओ काढून...

Swargate rape case Datta Gade latest update:विवाहबाह्य संबध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा. त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना तो ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा...

Mangesh Mahale

Datta Gade blackmailer: पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात परगावी जाणाऱ्या एका युवतीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. नराधम दत्ता गाडे याला पोलिसांनी 70 तासानंतर अटक केली आहे.

तपासात पुणे पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती मिळत आहे. मूळचा शिरुर येथील असलेला दत्ता गाडे याने हे कृत्य केले आहे. महिला, युवतींना फसवणाऱ्या दत्ता गाडे यांचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत.

दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. शिरुर परिसरात तो एका लॉजबाहेर बसून महिलांचे छुपे व्हिडिओ काढत असे. गाडेबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

विवाहबाह्य संबध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा. त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना तो ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा, अशी माहिती सुत्रांनी दिली.

आपली व आपल्या कुटुंबियांची बदनामी नको म्हणून अनेक महिला गाडे याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या. त्यामुळे गाडे यांचा असे गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढला होता. शिरुर परिसरातील लॉजच्या बाहेर बसून तो विवाहबाह्य संबध असलेल्या महिलांना हेरायचा, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील पीडीतेनं पोलिसांना दिलेला जबाबात गाडे याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे मी त्याला घाबरुन मला मारु नको, अशी विनंती केली होती, असे पीडितेने पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबात म्हटलं आहे. पोलिसांनी गाडे विरुद्ध पुरावे जमा करण्याचे काम सुरु केले आहे. शिवशाही बस फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT