Dattatraya Gade News : स्वारगेट एसटी बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणातील रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील पीडितेची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आरोपी दत्ता गाडे याने जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे मी त्याला घाबरुन मला मारु नको, अशी विनंती केली होती, असे पीडितेने पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबात म्हटलं आहे.
पुण्यातील शिवशाही बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांना आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल जप्त केला. पोलिसांकडून त्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपी आणि तरूणीमध्ये याआधी कोणतेही संभाषण झाले नसल्याचे उघड झाले आहे
शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे याने पीडीत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी गाडे विरुद्ध पुरावे जमा करण्याचे काम सुरु केले आहे. शिवशाही बस फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली आहे. दत्ता गाडे याला न्यायालायने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस तपासामध्ये दत्तात्रय गाडे यांनी आपण तृतीयपंथी असल्याचा जबाब दिला आहे. तसेच त्याने आपण समलैंगिंक असल्याचे देखील म्हटले. विशेष म्हणजे दत्तात्रय गाडे याचे लग्न झालेले असून त्याला बायको आणि मूल देखील आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.