sarkarnama
sarkarnama
पुणे

लाडका भाचा स्वर्णवची भेट अपूर्णच ; आत्याचा अपघाती मृत्यू

सरकारनामा ब्युरो

पुणे : अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण (swarnav chavan) सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरातील नागरिक साजरा करीत होते. अन् त्यांचाय या आनंदावर शोककळा पसरली आहे. स्वर्णवला भेटण्यासाठी येत असलेली त्याच्या आत्याचा अपघाती मृत्यू झाला. आपल्या लाडक्या भाच्याची भेट अपूर्ण राहिल्याने त्यांच्या कुंटुबात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात स्वर्णवचे आत्येभाऊ समर आणि अमन राठोड हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर बाणेर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सुनीता संतोष राठोड चव्हाण (वय 36 )असे (sunita santosh rathod chavan) अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. सुनीता या स्वर्णवला भेटण्यासाठी नांदेडहून पुण्याला येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. नगर रस्त्यावर हा अपघात झाला. पती समीर राठोड, समर राठोड (वय 14), अमन राठोड ( वय ६) अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी सर्वत्र शोध घेत होते. अखेर बुधवारी दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला.

पुनावळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्या वडिलांचा नंबर होता. दरम्यान, तेथील सुरक्षा रक्षक दादाराव जाधव याने बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. त्याचं कोणी अपहरण केलं? का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT