Pune News :  Sarkanama
पुणे

RTI मधून मागविलेल्या कागदपत्रांसाठी तलाठ्याने मागितली लाच अन् अडकला पोलिसांच्य जाळ्यात!

Pune News : ज्येष्ठ नागरिकांकडून दोन हजाराची मागणी...

सरकारनामा ब्यूरो

Pune News : भ्रष्टाचार मिटावा व नागरिकांना शासनातील विविध विभागातील लोकांना माहिती मिळावी या हेतूने माहिती अधिकार कायदा आमलात आणण्यात आला होता. मात्र माहिती अधिकारातून मागविण्यात आलेल्या कागदपत्रे मिळवण्यासाठी तब्बल दोन हजार रूपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोरे आला आहे. ही घटना पुण्याजवळील मुळशी तालुक्याच्या उरवडे गावात घडली आहे.

माहिती अधिकाराअंतर्गत रितसर अर्ज करून मागविण्यात आलेल्या कागदपत्रे देण्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका तलाठ्याला अटक केली. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय बाबूराव दाते (उरवडे, ता. मुळशी) असे या तलाठ्याचे नाव आहे. माहिती अधिकारातील कागदपत्रे विनाशुल्क देण्याबाबत राज्य माहिती आयोगाचा आदेश आहे. मात्र कागदपत्रे देण्यासाठी तलाठी दाते हा दोन हजार रुपये लाचेची मागणी करीत आहे, अशी तक्रार एका ६७ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तसेच, त्याला कोतवाल अमित भंडलकर यांनी मदत केली. यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उप-अधीक्षक क्रांती पवार करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT