Talegaon Wadgaon Nagarpalika Election 2025 Sarkarnama
पुणे

Talegaon Election 2025: ऐन थंडीत पडतोय पैशाचा पाऊस! एका मताला 10 ते 15 हजार रुपये

Talegaon Wadgaon Nagarpalika Election 2025: तळेगाव नगरपरिषदेत केवळ नऊ प्रभागांतील निवडणुकीत एका मताला 10 हजार रुपये, तर वडगाव नगरपंचायतीत 17 प्रभागांपैकी बहुतेक ठिकाणी एक मत 15 हजारांपर्यंत गेल्याची जोरदार चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

विजय सुराणा

तळेगाव नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना ऐन थंडीत ‘पैशाचा पाऊस’ पडू लागला आहे. तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत एका मताला तब्बल 10 हजार, तर वडगाव नगरपंचायतीत 15 हजार रुपयांपर्यंत भाव गेल्याची चर्चा आहे. आपले मत कोणत्या प्रभागात आहे, हे शोधण्यासाठी मतदारांची धावपळ सुरू झाली आहे.

तळेगाव नगरपरिषद : 28 पैकी फक्त 9 प्रभागांत लढत

तळेगाव नगरपरिषदेत भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युती झाली असून 19 जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे फक्त 9 प्रभागांतच प्रत्यक्ष लढती होत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून संतोष हरिभाऊ दाभाडे रिंगणात असून, अपक्ष म्हणून किशोर भेगडे आणि रंजना भोसले मैदानात उतरल्याने तिरंगी लढत रंगत आहे. नगरसेवकांच्या मोठ्या संख्येने झालेल्या बिनविरोध निवडीमुळे सुरुवातीला वातावरण शांत भासले, मात्र नगराध्यक्षपदातील किशोर भेगडे यांच्या स्पर्धेमुळे पुन्हा राजकीय तापमान वाढले आहे.

वडगाव नगरपंचायत : नगराध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत

वडगाव नगरपंचायतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढत, नगराध्यक्ष पदासाठी:मृणाल म्हाळसकर (भाजप), अबोली ढोरे (राष्ट्रवादी)वैशाली उदागे (वंचित बहुजन आघाडी),नाजमाबी शेख (अपक्ष)अशी चौरंगी लढत असली तरी खरी झुंज भाजप–राष्ट्रवादीमध्येच होत आहे.सदस्य पदासाठी 17 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात असून म्हाळसकर व ढोरे या दोन्ही घराण्यांची प्रभावी मोर्चेबांधणी रंगात आली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

मतांची ‘बाजारपेठ’: तळेगावला 10 हजार, वडगावला 15 हजार

तळेगाव नगरपरिषदेत केवळ नऊ प्रभागांतील निवडणुकीत एका मताला 10 हजार रुपये, तर वडगाव नगरपंचायतीत 17 प्रभागांपैकी बहुतेक ठिकाणी एक मत 15 हजारांपर्यंत गेल्याची जोरदार चर्चा आहे. बहुतांश प्रभागांत पैशांचे वाटप पूर्ण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आमची नावे वडगावला असती तर...”

वडगावातील काही नागरिकांचे मतदान पुणे, पिंपरी–चिंचवड किंवा इतर शहरांत स्थलांतरित झाले आहे. मात्र यंदा एका मताला 15 हजार रुपयांची किंमत ऐकून “आमची नावे वडगावलाच असती तर फायदा झाला असता,” अशा प्रतिक्रिया अनेक मतदार व्यक्त करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत तळेगावपेक्षा वडगाव नगरपंचायतीत पैशाचा पाऊस जास्त जोरात पडताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT