Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama
पुणे

Tanaji Sawant | मराठा संघटनांच्या इशाऱ्यानंतर तानाजी सावंतांचा माफीनामा

सरकारनामा ब्युरो

पुणे : मी एक लाख वेळा मराठा समाजाची माफी मागायला तयार आहे. पण आम्हाला टिकाऊ आरक्षण (Maratha Reservation) मिळालं पाहिजे, असं म्हणत वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. उस्मानाबादमध्ये बोलताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी विरोधकांवर टिका करताना मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली," असे सावंत म्हणाले. त्यावर मराठा क्रांती मोर्चाने (maratha kranti morcha) आक्रमक भूमिका घेत, "तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागावी,अन्यथा महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. त्यानंतर अखेर सावंत यांनी माफी मागितली आहे.

फडणवीस सरकार काळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण २०२० ला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकू शकलं नाही. या दोन वर्षांत कोणताही मराठा समाजातील नेता एकही शब्द बोलला नाही. पण राज्यात सत्तांतर होताच यांना मराठा आरक्षणासाठी जाग आली. ए.सी तून आरक्षण द्या, यातून द्या त्यातून द्या असं करुन समाजात दरी निर्माण करुन भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर मी बोट ठेवलं होत. हे कोण करतंय हे जनतेला माहिती आहे. यावर मी बोलत होतो.

आता राहिला विषय माफी मागायचा, ज्या समाजाच्या जिवावर मी ताठ मानेने फिरतो त्यांची मी माफी मागतो, जर त्यांच्या मनाला खटकलं असेल तर.. माझ्या समाजाची माफी मागायला मला लाज वाटत नाही. मी म्हटलं होतं, आम्हाला थोडा वेळ द्या मराठा आरक्षणाचं गेल्या दोन वर्षात जे काही नुकसान झालं आहे त्यात सुधारणा करण्यासाठी आम्हाला वेळ द्या, २०२४ पर्यंत जर आरक्षण नाही मिळालंं, तर हा तानाजी सावंत राजीनामा देऊन तुमच्यासोबत मोर्च्यात सामील होईल. माझ्या वक्तव्याने ज्या मराठा संघटना नाराज झाल्या असतील त्यांच्या मनाला थोड्या जरी वेदना झाल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT