Mahayuti Politics : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात विधान परिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढली आहे. पुण्यामधून पहिल्याच दिवशी तब्बल 60 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सोबत बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीत विधान परिषद निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपाचा फाॅर्म्युला देखील ठरला असल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, छत्रपती संभाजीनगरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, तर नागपूर पदवीधर आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना देखील आग्रही आहे.
पुण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. या जागेवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जात असल्याने अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होण्याची शक्यता आहे.
पुण्यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जातो आहे. तर, भाजप देखील आपल्या पदाधिकाऱ्याला येथे संधी मिळावी म्हणून ताकद लावत आहे.
पुणे मतदारसंघात पदवीधर मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर शिक्षक मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील या जागांवर दावा केला जातो आहे. अमरावतीच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, येथे काँग्रेस देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.