Ambegaon Shivsena Latest News Sarkarnama
पुणे

आंबेगावचा 'तो' व्हिडिओ थेट 'मातोश्री'वर...

Shivsena : दोन जेष्ठ शिवसैनिक एकमेकांवर भिडल्याचे चित्र सध्या सोशल मिडीयात चांगलेच व्हायरल झाले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवजन्मभूमी शिवनेरीहून नवीन चिन्ह मिळालेला मशालीची मिरवणूक काढून आंबेगाव शिवसेनेने मंचर मध्ये आज (ता.११ ऑक्टोबर) आणली. मात्र मंचरमध्ये येताच आंबेगाव शिवसेनेचे दोन जेष्ठ पदाधिकारी शिवसैनिक एकमेकांना थेट भिडले. हा व्हिडीओ व्हायरल तर झालाच शिवाय काही जणांनी थेट मातोश्रीवर पाठविल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या मशालीची बोहणी आंबेगावात हाणामारीने झाल्याचे चित्र आहे. अर्थात याबाबत अद्यापही आंबेगाव शिवसेनेच्या वतीने खुलासा केला नसला तरी थेट 'मातोश्री'वर पोहचलेल्या या व्हिडिओ बाबत आता आंबेगाव शिवसेनेला खुलासा द्यावाच लागणार आहे.

सन १९९० मध्ये अ‍ॅड. अविनाश रहाणे यांनी विद्यमान आमदार व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विधानसभा निवडणूकीत नाकीनऊ आणल्याने तेंव्हापासून आंबेगाव शिवसेना जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेत आहे. दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला आज नेमके मशाल चिन्ह मिळाल्याने त्यांची मिरवणूक काढण्यासाठी अ‍ॅड. रहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत थेट शिवनेरीहून मशाल मिरवत मिरवत आंबेगावात म्हणजेच मंचरमध्ये आणण्यात आली. या भव्य सजविलेल्या ट्र्कमध्ये आणलेल्या धगधगत्या मशालीने मंचरमधील प्रसिध्द शिवाजी चौक गाठताच इथे मात्र दोन जेष्ठ शिवसैनिक एकमेकांवर भिडल्याचे चित्र सध्या सोशल मिडीयात चांगलेच व्हायरल झाले.

या चित्रात सन २०१९ मध्ये वळसे पाटील यांच्या विरोधात उभे राहिलेले जेष्ठ शिवसैनिक प्रा. राजाराम बाणखेले आणि कोवीड काळात राज्यात उत्तम कामगिरी केली म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट फोन करुन कौतुक केलेले माजी सरपंच दत्ता गांजळे या दोघांमध्ये सदर हाणामारी झाल्याचा हा व्हिडीओ असल्याचे सोशल मिडीयावर सांगितले जात असले तरी दोघांकडून आणि अ‍ॅड. रहाणे यांचेकडूनही अद्याप खुलासा दिला गेला नसल्याने हा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी 'सरकारनामा' करीत नाही.

दरम्यान, अशा स्थितीतही हा व्हिडीओ थेट मातोश्रीवर पाठविला गेल्याची माहिती स्थानिकांमधूनच दिली जात असून प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडीओची मात्र मातोश्रीवरुन दखल घेतल्याची प्राथमिक माहितीही मिळत आहे.

पुणे : शिवजन्मभूमी शिवनेरीहून नवीन चिन्ह मिळालेला मशालीची मिरवणूक काढून आंबेगाव शिवसेनेने मंचर मध्ये आज (ता.११ ऑक्टोबर) आणली. मात्र मंचरमध्ये येताच आंबेगाव शिवसेनेचे दोन जेष्ठ पदाधिकारी शिवसैनिक एकमेकांना थेट भिडले. हा व्हिडीओ व्हायरल तर झालाच शिवाय काही जणांनी थेट मातोश्रीवर पाठविल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या मशालीची बोहणी आंबेगावात हाणामारीने झाल्याचे चित्र आहे.

अर्थात याबाबत अद्यापही आंबेगाव शिवसेनेच्या वतीने खुलासा केला नसला तरी थेट 'मातोश्री'वर पोहचलेल्या या व्हिडिओ बाबत आता आंबेगाव शिवसेनेला खुलासा द्यावाच लागणार आहे. (Ambegaon Shivsena Latest News)

सन १९९० मध्ये अ‍ॅड. अविनाश रहाणे यांनी विद्यमान आमदार व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विधानसभा निवडणूकीत नाकीनऊ आणल्याने तेंव्हापासून आंबेगाव शिवसेना जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेत आहे. दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला आज नेमके मशाल चिन्ह मिळाल्याने त्यांची मिरवणूक काढण्यासाठी अ‍ॅड. रहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत थेट शिवनेरीहून मशाल मिरवत मिरवत आंबेगावात म्हणजेच मंचरमध्ये आणण्यात आली. या भव्य सजविलेल्या ट्र्कमध्ये आणलेल्या धगधगत्या मशालीने मंचरमधील प्रसिध्द शिवाजी चौक गाठताच इथे मात्र दोन जेष्ठ शिवसैनिक एकमेकांवर भिडल्याचे चित्र सध्या सोशल मिडीयात चांगलेच व्हायरल झाले.

या चित्रात सन २०१९ मध्ये वळसे पाटील यांच्या विरोधात उभे राहिलेले जेष्ठ शिवसैनिक प्रा. राजाराम बाणखेले आणि कोवीड काळात राज्यात उत्तम कामगिरी केली म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट फोन करुन कौतुक केलेले माजी सरपंच दत्ता गांजळे या दोघांमध्ये सदर हाणामारी झाल्याचा हा व्हिडीओ असल्याचे सोशल मिडीयावर सांगितले जात असले तरी दोघांकडून आणि अ‍ॅड. रहाणे यांचेकडूनही अद्याप खुलासा दिला गेला नसल्याने हा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी 'सरकारनामा' करीत नाही.

दरम्यान, अशा स्थितीतही हा व्हिडीओ थेट मातोश्रीवर पाठविला गेल्याची माहिती स्थानिकांमधूनच दिली जात असून प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडीओची मात्र मातोश्रीवरुन दखल घेतल्याची प्राथमिक माहितीही मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT