Chinchwad By-Election  Sarkarnama
पुणे

Aam Aadmi Party : `चिंचवड`मध्ये लढण्याआधीच 'आप'ला धक्का; तर ३३ जणांचे अर्ज वैध

Chinchwad By-Election : ४० पैकी सात उमेदवारांचे अर्ज आज छाननीत बाद झाले

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ४० पैकी सात उमेदवारांचे अर्ज आज छाननीत बाद झाले, तर ३३ वैध ठरले. आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार मनोहर पाटील यांचा हा अर्ज बाद झाल्याने या पक्षाला धक्का बसला आहे.

उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्मही अपूर्ण असल्याने `आप`च्या उमेदवारांचा अर्ज अवैध ठरला. तर, भाजपच्या मुख्य उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांची उमेदवारी वैध ठरल्याने बदली उमेदवार (डमी) शंकर जगताप यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.

अश्विनी आणि शंकर जगताप यांनी प्रत्येकी चार-चार अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले. तर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बंडखोर राहूल कलाटेंचे तीनपैकी दोन अर्ज वैध ठरले. तर एक बाद झाला.

शिवसेनेचा त्यांचा अर्ज हा पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने बाद करण्यात आला. तर, अपक्ष म्हणून त्यांची उमेदवारी वैध ठरली आहे. चेतन ढोरे या अपक्षाचे प्रतिज्ञापत्र अपूरे असल्याने, तर गणेश जोशी आणि उमेश म्हेत्रे या अपक्षांकडे पुरेसे सूचक नसल्याने या तिघांचे अर्ज बाद झाले.

उमेदवारी अर्ज अपूर्ण ठेवल्याचा फटका आणखी एक अपक्ष प्रकाश बालवडकर यांनाही बसला. तर, संजय मागाडे या आणखी एका अपक्षाने अनामत रक्कम तथा अर्ज शुल्क न भरल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. अशारितीने ४० उमेदवारांनी दाखल केलेल्या ५३ अर्जांपैकी सात उमेदवारांचे १३ अर्ज बाद झाले. तर ३३ उमेदवारांचे चाळीस अर्ज वैध ठरले आहेत.

त्यात बहूतांश म्हणजे २६ उमेदवार अपक्ष, पाच नोंदणीकृत पक्षांचे, तर दोन राष्ट्रीय पक्षांचे आहेत. दहा तारखेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मतदानासाठी एक की दोन ईव्हीएम लागणार हे ही कळेल. २६ तारखेला मतदान होऊन २ मार्चला निकाल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT